शिवालय कार्यालयात रक्षाबंधनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा.

शिवालय कार्यालयात रक्षाबंधनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा.

वरोरा
चेतन लूतडे

वरोरा तालुक्यातील रवींद्र शिंदे (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट )यांचे शिवसेना कार्यालयात रक्षाबंधनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी रविंद्र शिंदे यांना शेकडो बहिणींनी राखी बांधत आशीर्वाद दिले.

रक्षाबंधनाचा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. वरोरा शहरात सुद्धा सामाजिक कार्य करणाऱ्या शिवसेनेच्या संघटिका नर्मदा ताई पेंदोर यांनी शिवालय कार्यालयात रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित केला होता ‌. यावेळी तालुक्यातील शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. महिलांचे रक्षण करणाऱ्या भावांसाठी शिवसेना कार्यालयात हा सन मोठ्या उत्साहात साजरा केला गेला. यावेळी तिथे असणारे कार्यकर्ते, कर्मचारी, पत्रकार, डॉक्टर, पोलीस तथा शिवसेनेचे विधानसभा प्रमुख रवींद्र शिंदे , दत्ता बोरेकर, खेमराज कुरेकार यांना राखी बांधून हा सण साजरा करण्यात आला. याव्यतिरिक्त पोलीस विभाग व सरकारी रुग्णालय येथील कर्मचारी व डॉक्टर्स यांना सुद्धा शिवसेना महिला कार्यकर्त्यांनी राखी बांधून रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला.
उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विधानसभा प्रमुख रवींद्र शिंदे यांनी सामाजिक बांधिलकी म्हणून वरोरा भद्रावती क्षेत्रातील बऱ्याच भगिनींना रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट च्या स्वरूपात मदत केली आहे ‌. त्यांच्या या ऋणाचे भान ठेवत तालुक्यातील बहिणींनी राखी बांधून भावाने अशीच मदत सेवा गरजूंसाठी सुरू ठेवावी अशी आशा व्यक्त केली. तालुक्यातील शेकडो बहिणींनी यावेळी त्यांना राखी बांधून आशीर्वाद दिले. त्यामुळे शिवायलावर खऱ्या अर्थाने रक्षाबंधनाचा कार्यक्रम सार्थ ठरला.

Comments