गट ग्रामपंचायत जळका च्या सरपंच पायउतार *आठ विरुद्ध एक मतांनी अविश्वास प्रस्ताव पारित

गट ग्रामपंचायत जळका च्या सरपंच पायउतार 

*आठ विरुद्ध एक मतांनी अविश्वास प्रस्ताव पारित 
Anil Patil warora.
वरोरा : तालुक्यातील जळका येथील गट
 ग्रामपंचायत च्या सरपंच नीता प्रशांत बोढाले यांच्या कार्यपद्धतीवर नाराज होऊन तेथील ग्रामपंचायत सदस्यांनी त्यांच्या विरुद्ध अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. त्यानुसार आज शुक्रवार दि.११ ऑगस्ट रोजी तहसीलदार योगेश बाळासाहेब कौटकर यांनी विशेष सभेचे आयोजन करून यावर मतदान घेतले. तेंव्हा नऊ सदस्य संख्या असलेल्या गट ग्रामपंचायत जळका मध्ये आठ विरुद्ध एक अशा फरकाने सरपंच निता प्रशांत बोढाले यांच्या विरुद्ध अविश्वास प्रस्ताव पारित झाला. दरम्यान या ग्रामपंचायतचा प्रभार उपसरपंच प्रफुल महादेव आसुटकर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
वरोरा तालुक्यातील जळका येथील गट ग्रामपंचायत च्या सरपंच नीता प्रसाद बोढाले या मनमानी कारभार करीत असल्याचा आरोप उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांचा होता. ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता कामे करणे, परस्पर निधीचा उपयोग करणे, मर्जीतील लोकांना कामे देणे, अतिक्रमण करणाऱ्या लोकांना सहकार्य करणे, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांनी सुचवलेली कामे हेतू पुरस्कृत टाळणे असे आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले होते. यामुळे ग्रामपंचायत सदस्यांनी सरपंचांवर अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता.या बाबत तहसीलदार योगेश बाळासाहेब कौटकर यांनी आज शुक्रवार दि.११ ऑगस्ट  रोजी जळका गट ग्रामपंचायत कार्यालयात विशेष सभेचे आयोजन केले होते. या सभेला संपूर्ण नऊ सदस्य उपस्थित होते. यादरम्यान पुरुषोत्तम विठ्ठल उइके यांनी सभेपुढे अविश्वास प्रस्तावा बाबत विषय मांडला. या विषयाला गणेश नानाजी गराटे यांनी अनुमोदन दिले. यानंतर सरपंच नीता प्रशांत बोढाले यांनी आपले मत मांडताना आरोपा संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशीची मागणी केली. दरम्यान यावर एकमत न झाल्याने अविश्वास प्रस्तावावर मतदान घेण्यात आले. तेव्हा उपसरपंच प्रफुल महादेव आसुटकर,सदस्य छबूताई भीमराव झाडे, सरिता सूर्यभान सातपुते, कुमुद शरद मडावी, मयूर सूर्यभान वाळके, गणेश नानाजी गराटे, पुरुषोत्तम विठ्ठल उइके, रूपाली अतुल भालशंकर यांनी अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने मतदान केले. तर सरपंच निता प्रशांत बोढाले यांनी अविश्वास प्रस्तावाच्या विरुद्ध मतदान केले. अशा रीतीने आठ विरुद्ध एक मतांच्या फरकाने सरपंच नीता प्रशांत बोढाले यांच्या विरुद्ध अविश्वास प्रस्ताव पारित झाल्याचे तहसीलदार योगेश बाळासाहेब कौटकर यांनी जाहीर केले. दरम्यान या ग्रामपंचायतचा प्रभार उपसरपंच प्रफुल महादेव आसुटकर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. यावेळी ग्रामसेवक दिनेश साव उपस्थित होते.

Comments