वरोरा फोटोग्राफरांनी आनंदवनात साजरा केला जागतिक छायाचित्रकार दिन ▫️ स्नेहभोजन वाटप, वृक्षारोपण, सुगम संगीत व जेष्ठ छायाचित्रकार सत्कार

▫️वरोरा फोटोग्राफरांनी आनंदवनात साजरा केला जागतिक छायाचित्रकार दिन 
 
▫️ स्नेहभोजन वाटप, वृक्षारोपण, सुगम संगीत व जेष्ठ छायाचित्रकार सत्कार

वरोरा (प्रतिनिधी) :  वरोरा तालुका फोटोग्राफर तर्फे जागतिक छायाचित्रकार दिनाचे औचित्य साधून स्नेहभोजन वाटप, वृक्षारोपण, सुगम संगीत व जेष्ठ छायाचित्रकार यांचा सत्कार सोहळा पार पाडला.
या सोहळ्याची सुरवात आनंदवन येथील कलाकार यांनी सुगम संगीत गाऊन कार्यक्रमाची सुरवात केली.         

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व सत्कार मूर्ती म्हणून जेष्ठ छायाचित्रकार जनार्धन ताजने, शंकर लालसरे, दामोधर टोकेकर, विश्वस्त म. से. स. स्वरानंदवन  विभाग प्रमुख सदाशिव ताजने, योग शिक्षक व कवी दीपक शिव उपस्थित होते.  मान्यवरांनी यावेळी फोटोग्राफी बद्दल ब्लॅक अँड व्हाईट काळ आणि डिजिटल काळातील फोटोग्राफी मध्ये काय फरक आहे यावर युवा फोटोग्राफर यांना महत्व कळवून दिले. 

 यावेळी जेष्ठ छायाचित्रकार यांचा वरोरा तालुका फोटोग्राफर च्या वतीने स्मृती चिन्ह व पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला. तर सदाशिव ताजने, आणि दीपक शिव यांनाही स्मृती चिन्ह व पुष्पगुछ देऊन सन्मानित करण्यात आले. 
याप्रसंगी आनंदवन अभयारण्य येथे स्नेह-भोजन वाटप केले व वृक्षारोपण करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन डॉ. प्रा. प्रवीण मुधोळकर यांनी केले तर आभार वरोरा तालुका फोटोग्राफर असोसिएशन चे अध्यक्ष विशाल ढवस यांनी मानले.   या कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता सागर साळवे, शिरीष उगे, प्रशांत ताजने, संतोष फुटाणे, गिरीश टोंगे, रामदास तुराणकर, नितीन भोजेकर, विनोद सम्रतकर, अमोल लडी, विनोद मसाडे, विजय आत्राम, तुषार घोनाडे, भारत सिन्हा, सतीश विरुटकर, वैभव पोटे, अक्षय पेंदाम, प्रशील बागेसर  तालुक्यातील फोटोग्राफर उपस्थित होते.

Comments