सुभेदार चा नेत्रदीपक पोस्टर लॉन्चिंग सोहळा संपन्न!!

सुभेदार चा नेत्रदीपक पोस्टर लॉन्चिंग सोहळा संपन्न!!

 वरोरा दिनांक 24 ऑगस्ट 
# वरोऱ्याच्या निर्मत्याचा सुभेदार हा चौथा चित्रपट.

         राज वारसा प्रोडक्शन निर्मित मराठी चित्रपट सुभेदार दिनांक २५ ऑगस्ट रोजी महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. त्याचे औचित्य साधून वरोरा शहरांत चित्रफलकाचे अनावरण बुधवारी, २३ ॲागष्ट ला गोठी मेडिकलच्या इमारतीवर पार पडले.
    चंद्रपुर जिल्ह्यात प्रथमच पोस्टर लॉंचिंग सोहळा आयोजित करण्यात आला होता. लोकशिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा श्रीकांत पाटील, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते केशव ठमके, प्रसिद्ध व्यापारी नरेंद्र डोंगरवार,  धीरज गोठी,  विद्या भारती चे माजी पदाधिकारी अविनाश नेवासकर, विश्व्  हिंदू परिषदेचे जिल्हा संपर्क प्रमुख, पराग दवंडे, पारस उद्योग समूहाचे संचालक अमोल मुथा, डॉ. सागर वझे, प्रकाश नाहर आदींच्या उपस्थितीत फलकाचे अनावरण करण्यात आले
    या प्रसंगाचे ड्रोन ने चित्रीकरण करून फुलांचा वर्षाव करताच तरुणांनी एकच जल्लोष केला. याप्रसंगी बोलताना प्रा श्रीकांत पाटील यांनी शिवचरित्रातील उदाहरणांचा दाखला देत मालुसरे घराण्याचे योगदान अधोरेखित केले. छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची पताका आसमंतात फडकविली. आपल्या घरातील विवाह सोहळ्याची चिंता न करता तानाजी मालुसरे हे लढले. त्यांचे हे   हौतात्म इतिहास कधीही विसरणार नाही से ते म्हणाले. वरोरा शहरातील अनिल वरखडे या तरुण निर्मात्याने संस्कारमय चित्रपटात ची निर्मिती करण्याचा केलेला संकल्प हा अभिनंदनीय असल्याचे ते यावेळी म्हणाले.
        वरोरा शहरवासीयांसाठी ही अनोखी भेंट या चित्रपटाचे निर्माते अनिल नारायणराव वरखडे  यांनी देत सुभेदार चित्रपटामागील भूमिका स्पष्ट केली. वीर सुभेदार तान्हाजी मालुसरे आणि सिंहगड युद्ध यावर हा चित्रपट आधारीत असल्याचे सांगत शिवराज अष्टकातील हे पाचवे चित्र पुष्प रसिकांनी आवर्जून पाहावे असे ते म्हणाले.
          याप्रसंगी अनिल वरखडे यांचा शहरवासीयांतर्फे शॉल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ प्रशांत खुळे यांनी केले. सुभेदार चित्रपटातील गीतांनी परिसर निनादला होता. तरुण आणि रसिकांची मोठी उपस्थिती याप्रसंगी होती.

Comments