नागरिकांच्या विविध समस्यांकडे लक्ष वेधणारे निवेदन; दिव्यांग नागरिकांचे ५% निधी थकविल्याने आंदोलनाचा इशारा; नगर परिषदेला निवेदन सादर

नागरिकांच्या विविध समस्यांकडे लक्ष वेधणारे निवेदन;  दिव्यांग नागरिकांचे ५% निधी थकविल्याने आंदोलनाचा इशारा; नगर परिषदेला निवेदन सादर   वरोरा, दि. १८ मार्च – शहरातील मूलभूत सुविधांच्या प्रश्नांसह दिव्यांग नागरिकांचा ५ टक्के निधी थकविल्याप्रकरणी जिल्हा शांतता समिती सदस्य शेख जैरुदीन (छोटूभाई) यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने नगराध्यक्ष अर्चना आशिष ठाकरे यांना निवेदन सादर करून मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. नगर परिषद कार्यालयात आयोजित बैठकीत शेख जैरुदीन यांनी सांगितले की, शहरातील हजारो नागरिक कर भरूनही मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत.   दरवर्षी ५० ते ६० लाख रुपये उपभोक्ता कर भरूनही दर दोन दिवसांनी घंटागाडी येत असल्याने घरात कचरा साचतो. दररोज घंटागाडी पाठवावी अन्यथा कर अर्धा करावा.  अनेक महिन्यांपासून फवारणी न झाल्याने मच्छर व विषारी जंतूंचा प्रादुर्भाव वाढला आहे. महिन्यातून दोन वेळा फवारणी करण्याची मागणी केली आहे. शहरात मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्यांनी अनेक नागरिकांना चावा घेतला असून त्वरित  कारवाई करावी. उन्हाळ...

शेगाव येथील मृतकाच्या परिवारांना आमदार प्रतिभाताई धानोरकरांची आर्थिक मदत

 मृतकाच्या परिवारांना आमदार प्रतिभाताई धानोरकरांची आर्थिक मदत

चंद्रपूर : घोडाझरी तलावात बुडून वरोरा तालुक्यातील चार युवकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हि घटना अतिशय वेदनादायी असून या कुटुंबियांसोबत त्यांच्या दुःखात सहभागी असल्याची भावना आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी व्यक्त केली.  शेगाव येथील मनीष श्रीरामे, धीरज झाडें, चेतन मांदाडे व गिरोला येथील संकेत मोडक असे मृतक युवकांची नावे आहेत. आज आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना आर्थिक सहकार्यकरीत सांत्वन केले.  

याप्रसंगी राजूभाऊ चिकटे माजी सभापती कृ ऊ बा वरोरा,  मिलींद भोयर तालुका अध्यक्ष काँग्रेस पार्टी वरोरा,  निलेश भालेराव योगेश खामनकर,  यशवंत लोडे,  प्रभाकर घोडमारे,  दिवाकर मेश्राम, दिवाकर निखाडे,  शंकर घोडमारे,  पुरुषोत्तम निखाडे,  प्रफुल वाढई ग्रा.प सदस्य शेगाव   व इ कार्यकर्ते उपस्थित होते. 

यावेळी आमदार प्रतिभाताई धानोरकर म्हणाल्या कि, पावसाळ्यात जिल्ह्यात अनेक ठिकाणी युवक फिरायला जात असतात. परंतु त्यांनी पावसाचा आनंद घेत असतांना अधिक जोखिमेचे पाऊल उचलू नये. असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.
 जाहिरात 


Comments