स्मशानात जाण्यासाठी सुद्धा हाल अपेष्टा सहन कराव्या लागतात. ग्रामपंचायत जळका येथील सरपंच ,सचिव यांचे दुर्लक्ष
स्मशानात जाण्यासाठी सुद्धा हाल अपेष्टा सहन कराव्या लागतात.
ग्रामपंचायत जळका येथील सरपंच ,सचिव यांचे दुर्लक्ष
वरोरा
चेतन लूतडे
वरोरा तालुक्यातील माढळी जवळ असलेल्या जळका गावातील रस्त्याची दयनीय अवस्था असून स्मशानात जाण्यासाठी सुद्धा हाल अपेष्टा सहन कराव्या लागतात.
जळका या गावाच्या काही अंतरावर स्मशानभूमी असून या स्मशानभूमी कडे जाणारा मार्गची दैनावस्था झाली की हा रस्ता पुर्णतः खराब झालेला आहे. या रस्त्याच्या मधोमध पाणी वाहत असून रस्ता आहे की नाला हे कळयला मार्ग नाही.
अंत्यसंस्काराला जाणारे लोक तसेच मयत घेऊन चालणारे कधीही प्रेत घेऊन खाली पडू शकेल एवढा हा रस्ता खराब झालेला आहे. गावातील काही लोकांनी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना अनेक वेळा या स्मशानभूमी रस्त्याबद्दल बोलूनही याकडे जळका गावातील सरपंच, सचिव तसेच प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. अंत्यसंस्काराला जाणाऱ्या लोकांचे कधीही रस्त्यावर पडून नुकसान होऊ शकते. कमीत कमी ग्रामपंचायत मधील सामान्य फंडातून तात्काळ रस्ता करावा अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
या गावात ग्रामपंचायतीने मरण पावलेल्या लोकांसाठी तरी रस्ता करून द्यावा. असा लाजिरवानाआ प्रश्न सरपंच व सचिवाला लोक विचारत आहे.
गावकऱ्यांचे स्मशानभूमी कडे जाण्यासाठी हाल होत असून हा रस्ता केव्हा बनणार असे सर्व गावकरी बोलून रोष व्यक्त करीत आहे. त्यामुळे वरिष्ठ प्रशासनाने आवर्जून लक्ष देणे गरजेचे आहे.
Comments
Post a Comment