माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या काळात शुभारंभ झालेला पाझरबोडी तलाव अजूनही थंडबस्त्यात.
लघु पाटबंधारे विभाग चंद्रपूर यांचे दुर्लक्ष.
गावकरी आंदोलन उभारणार.
चेतन लूतडे
वरोरा 25/7/23
वरोरा तालुक्यातील 22 किलोमीटर अंतरावर तुमगाव गावामध्ये तलाव निर्मितीचे कार्य माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या काळात सुरू झाले होते. मात्र गेल्या 30 वर्षाच्या कालावधीत हा तलाव पूर्ण होऊ शकला नाही.
उमरी -तुंमगाव या गावांमध्ये अंदाजे 1987 साली माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या हस्ते पाझरबोडी तलावाच्या कामाचे शुभारंभ करण्यात आले होते. यानंतर या कामांमध्ये बराच व्यत्यय आला. 2005 साली पुन्हा कामाला सुरुवात करून 2007 साली बंद करण्यात आले. त्यावेळेस जमीन संपादन करीत असताना जमीन मालकांना मोबदला दिला गेला होता. पाझरबोडी तलावाच्या पाळीचे काम सुरू झाले होते. दोन्हीही बाजूंना तलावाची पाळ बांधण्यात आली. मात्र 2007 पासून काम पूर्णतः थांबल्याने या दोन पाळीच्या मधातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे. हे सर्व पाणी दरवर्षी पावसाळ्यात शेकडो शेतकऱ्यांची शेतीचे नुकसान करीत जात आहे. त्यामुळे येथील शेतकरी त्रासले असून पाझरबोडी तलावाचे काम पूर्ण करावे. अन्यथा बांधलेल्या पाळी काढून टाकाव्या अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
या तालाव्याच्या पाळीमुळे उमरी ,तूमगाव, बोपापूर परिसरातील शेकडो हेक्टर जमीन पाण्याचा प्रवाहाने नापीक होऊन राहिली आहे. गेल्या 30 वर्षापासून येथील शेतकरी हा त्रास सहन करत असून लघु पाटबंधारे विभाग चंद्रपूर यांना वारंवार तक्रारी व निवेदन देऊन सुद्धा जाग येत नाही आहे.
या परिसरातील शेतकऱ्यांनी उभारलेले कुकूटपालन, बकरी पालन, जनावरासाठी उभारलेले गोठे, शेतीतील सोयाबीन ,कापूस, शासनाने बनवलेले रोड अशी अनेक हानी झाली असून याला जबाबदार लघु पाटबंधारे विभाग चंद्रपूर असल्याचे तेथील गावकरी डॉक्टर विवेक तेला यांनी सांगितले.
त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांनी लघु पाटबंधारे विभाग चंद्रपूर यांच्या कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.
जाहिरात
Comments
Post a Comment