भारतीय जनता पक्षा तर्फे हनुमान मंदिरास साऊंड सिस्टम भेट.डॉक्टर सागर वझे यांची मंदिरास अनोखी भेट.

भारतीय जनता पक्षा तर्फे हनुमान मंदिरास साऊंड सिस्टम भेट.

डॉक्टर सागर वझे यांची मंदिरास अनोखी भेट.

वरोरा17/7/23
चेतन लूतडे 

वरोरा येथील स्थानीक मालवीय वार्डातील श्री गणेश मंदीर व श्री हनुमान मंदीर येथे लाऊड स्पीकर व साऊंड सिस्टम भेट देण्यात आली.

वरोरा येथील प्रख्यात डॉक्टर व सिनेट सदस्य सागर वझे यांच्या नेतृत्वात स्थानिक भाजपा कार्यकर्तेच्या उपस्थितीत गणेश व हनुमान मंदिराचे अध्यक्षिका यांना आरती आणि भजन परिक्रमा करण्यासाठी भाजपा पक्षातर्फे साऊंड सिस्टम ची भेट देण्यात आली. मालवीय वार्डातील छाबडा यांच्या घरासमोर हे सुंदर मंदिर असून रोज या ठिकाणी भाविक दर्शनासाठी येत असतात. या निमित्ताने विविध कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात येते. त्यामुळे दैनंदिन सूचना आणि भजन कीर्तन , प्रवचन करण्यासाठी ही भेटवस्तू दिल्याचे यावेळी सांगण्यात आले. 

 या कार्यक्रमासाठी भाजपा चे तालुकाध्यक्ष डॉ गायकवाड, सुरेश महाजन अमीत चवले ,ओम मांडवकर माजी नगरसेवक सन्नी गुप्ता, ओम यादव व वार्डातील भाविक उपस्थीतीत होते.


Comments