प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये आचार्य पदवी प्राप्त

वरोरा, दिनांक 15 मार्च २०२६ प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये  आचार्य पदवी प्राप्त वरोरा : मनीषा दर्शन बारसागडे यांनी जिद्द,चिकाटी, आत्मविश्वास आणि प्रचंड गुणवत्तेच्या बळावर गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथून अर्थशास्त्र विषयात पीएच.डी पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी "चंद्रपूर जिल्ह्यातील संजय गांधी निराधार योजनेचे आर्थिक व सामाजिक अध्ययन'"(सत्र २०१०-११ ते २०२०-२१) या विषयावर संशोधन केले. त्यांचे मार्गदर्शक प्रोफेसर डॉ. राजेश पी कांबळे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, ब्रह्मपुरी यांच्या मार्गदर्शनाखाली हे संशोधन पूर्ण केले. मनीषा नरेंद्र पाटील  हे  रमाई परिसर, बोर्डा तालुका वरोरा जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी असून ते मूळचे चिमूर तालुक्यातील किटाडी (तुकूम) या गावातील असून त्यांचे माहेर पवनी तालुक्यातील बेटाळा( वाही)हे असून सध्या आनंद निकेतन महाविद्यालयांमध्ये तासिका तत्त्वावर कार्यरत आहेत. या यशस्वी संशोधनाबद्दल त्यांचे पती प्रोफेसर डॉ. नरेंद्र केशव पाटील, आनंद निकेतन महाविद्...

बीएस इस्पात कंपनीने युवकांना केले बेरोजगार , कामगाराचा आंदोलनाचा इशारा

बीएस इस्पात कंपनीने युवकांना केले बेरोजगार

कामगाराचा आंदोलनाचा इशारा

वरोरा
चेतन लूतडे 15july2023

वरोरा तालुक्यातील मजरा येथील बीएस इस्पात कंपनी नेहमी वादग्रस्त ठरल्याचे चित्र दिसत आहे. कंपनीचे नवीन मालकानी जेव्हा पासून कंपनी टेक ओवर केली आहे. तेव्हापासून स्थायी रोजगार संबंधीचा वाद नेहमी उफाळत  राहिला आहे. ही कंपनी स्पाज आयरन व विद्युत निर्मिती करण्याचे काम करीत आहे. या कामगारांनी कंपनीचे प्रोडक्शन सुरू केले होते. 
या कंपनीमधील 2020 पासून कार्यरत कामगारांना कोणतीही कारण न सांगता कामावरून कमी करण्यात आले आहे. त्यामुळे या युवकांनी कंपनी विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली असून न्याय मागण्यासाठी राजकीय पाठबळ मिळवीत आहे.
या कंपनीतील अकरा कामगार नियमित कामावर जात असताना . कामगार पुरवण्याचा ठेका फरीदाबाद येथील थर्ड पार्टी कॉन्ट्रॅक्टर लकी इंजीनियरिंग कंपनी यांना देण्यात आला होता. मात्र हा कॉन्ट्रॅक्ट संपून दोन महिने उलटले होते. यानंतर कामगाराची गरज असल्यामुळे कंपनीने दोन महिने या कामगाराकडून काम करून घेतले. मात्र यानंतर यांची गरज संपल्यामुळे तडकाफडकी कंपनीने या कामगारांना बाहेरचा रस्ता  दाखवला. त्यामुळे नाराज झालेल्या कामगारांनी थेट पोलीस स्टेशनमध्ये लेखी तक्रार दाखल केली. 
यावेळी कामगारांसोबत बोलत असताना कामगारासाठी जिल्ह्यामध्ये कोणी वाली उरलेले नाही कामगारावर उपासमारीची वेळ आली असून प्लांट जर तोट्यात चालत असेल तर पूर्णतः बंद करावा अशी खंत कामगारांनी व्यक्त केली. कामगार आयुक्त सुद्धा मदत करीत नसून येणाऱ्या दिवसात कंपनी पुढे आंदोलन करण्याची भूमिका त्यांनी व्यक्त केली आहे.
मागील काही दिवसाचे पगार कंपनीकडे बाकी असून पीएफ आणि esic कंपनीने भरला नसल्याचाही दावा त्यांनी केला. 
त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील कंपनीचे ऑडिट करून बेरोजगारांना रोजगार देण्याची मागणी युवकांनी प्रशासनाला केली आहे.

मॉर्निंग व ग्रुप श्रमदान शिबिर, वरोरा 


Comments