पेट्रोल पंप वर 1 लाख 54 हजाराची चोरी


पेट्रोल पंप वर 1 लाख 54 हजाराची चोरी

वरोरा

पेट्रोल पंपावर केबिन समोर काम करणारे कर्मचारी रात्रीच्या सुमारास झोपले असताना त्यातील एका कर्मचाऱ्यांच्या पॅन्टच्या खिशातून अज्ञात व्यक्तीने चावी काढली व केबिनमधील लॉकरमध्ये ठेवलेले १ लाख ५४ हजार पळविले. ही घटना महामार्गावरील एकर्जुना गावाच्या शिवारातील पेट्रोल पंपावर गुरुवारी रात्री घडली.
महरमार्गालगत मालू पेट्रोल पंप आहे. २९ जून रोजी या पेट्रोल पंपावरील चार कर्मचारी पेट्रोल पंपाच्या केबिन समोर झोपले होते. यावेळी अज्ञात व्यक्तीने झोपलेल्या कर्मचाऱ्यांच्या खिशातून चाबी काढली व केबिनमध्ये असलेल्या लॉकरचे दार उघडून १ लाख ५४ हजार रुपये घेऊन पोबारा केला. यासोबतच झोपलेल्या एका कर्मचाऱ्यांचा खिसा कापून काही रक्कम नेली. खिसा कापणे, ड्रावर उघडणे आणि त्यातून रक्तम पळविली जात असताना

या कर्मचाऱ्यांना जाग येऊ नये याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. याच पेट्रोल पंपाच्या मागे असलेल्या पद्मालय वसाहतीमध्ये चोरांनी काही घरी चोरी करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यात त्यांना यश आले नाही, अशी माहिती वसाहतीमधील नागरिकांनी दिली.

पेट्रोल पंपावर सीसीटीव्ही कॅमेरे असणे अत्यावश्यक आहे. पंपावर सीसीटीव्ही कॅमेरे आहे. मात्र ते बंद असल्याचे समजते. त्यामुळे चोरांना शोधणे कठीण झाल्याचे पोलिसांनी सांगितले. पुढील तपास वरोडा पोलिस करीत आहेत. 

Comments