रत्नमाला चौकाजवळील रेल्वे फुलाखाली मिळाले अनोळखी इसमाचे प्रेत


पोलीस स्टेशन वरोरा अंतर्गत दी 06/06/23 रोजी रत्नमाला  पुलाचे खाली railway पोल क्रं,831/15-17 पोल जवळ  रेल्वे ट्रॅक वर एक अनोळखी पुरुष इसम रेल्वे अपघातात मृत अस्वस्थेत पडून असल्याची माहिती स्टेशन प्रबंधक वरोरा यांनी पोस्टे ला दिली असता घटनास्थळी जाऊन पाहणी केली. एक अनोळखी पुरुष इसम वय अंदाजे 55 ते 60 वर्ष हा मयत अवस्थेत पडुन दिसला‌. मृतकाने गुलाबी रंगाची  शर्ट, पांढरी बनियान, आकाशी रंगाची underwear ,  निळ्या रंगाचा पँट घातला आहे . उजव्या हातावर मराठीत *विठ्ठल* लीहाले असून  त्याचेकडे एकही वस्तु मिळुन न आल्याने मयताची ओळख पटलेली नसुन मृतकाची ओळख पटवण्याचा प्रयत्न करीत आहोत. कुणी मृतकला ओळखत असल्यास पोलिस स्टेशन वरोरा येथे संपर्क करावा.

Comments