सामाजिक कार्यकर्ता शुभम आमने यांच्या प्रयत्नाला यश

सामाजिक कार्यकर्ता शुभम आमने यांच्या प्रयत्नाला यश

वरोरा दि.२4 जून २०२३
     
   वरोरा येथील संभाजी सायरे औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे विद्यार्थी आशिष गजानन माणूसमारे यानी दि. १४/८/२०२० रोजी इलेक्ट्रिशन आय.टी.आय.ला प्रवेश घेतला होता. काही दिवस नियमित कॉलेज केले. परंतु काही दिवसातच राज्यात कोरोना ची परिस्थिती निर्माण झाली. नंतर कॉलेज बंद पडले. त्याच काळात त्याला परीक्षेला बसायचं  होत. परंतु घरची आर्थिक स्थिती म्हणजे पैसे नसल्यामुळे आशिष ला फी न भरल्यामुळे  त्याला परीक्षेला पण बसता आलं नाही.नंतर त्याला आर्थिक स्थिती सुधारेल अशी आशा होती तरी सुधारली नाही. संस्थेला ऐकून ३५ हजार रु. भरून त्याचा संस्था ला प्रवेश होता. इतकी मोठी रक्कम भरणे शक्य नसल्याने त्याने शिक्षण न घेण्याचं ठरविले होते. त्यांनी अनेक वेळा टी.सी.आणि गुणपत्रिका परत मागण्याचा प्रयत्न देखील केला होता परंतु त्याला दिले नाही अस करता- करता त्याच शैक्षणिक एक वर्षाच नुकसान झाल. अशी समस्या त्याने सामाजिक कार्यकर्ता शुभम आमने यांना सांगितली आणि यांनी प्रयत्न सुरु केले.असं एक वर्षापासून टी. सी.परत मिळविण्यासाठी म्हणून संघर्ष सुरु होता. अनेक सामाजिक आणि राजकीय नेत्यांना देखील विषय सांगितला परंतु कोणीच दखल घेतली नाही. सामाजिक कार्यकर्ता म्हणून शुभम आमने यांनी त्याची टी.सी.आणि गुणपत्रिका परत मिळवून देण्याचे ठरविले होते. आणि ते मिळवून देखील दिले.त्या मुळे त्याला पुढील शिक्षण घेणं शक्य झालं आहे त्या बद्दल आशिष ने शुभम आमने आभार व्यक्त केले.

Comments