८१ ग्रामपंचायतींमध्ये साहित्य खरेदीत घोटाळा?बीडीओंची केली विभागीय आयुक्तांकडे तक्रार

८१ ग्रामपंचायतींमध्ये साहित्य खरेदीत घोटाळा?

बीडीओंची केली विभागीय आयुक्तांकडे तक्रार

 चंद्रपूर : ग्रामपंचायत स्तरावरील २०२०-२१ ते २०२२-२३ अंतर्गत १५वा वित्त आयोग निधी तसेच सामान्य फंड निधीचे ग्रामपंचायत खरेदीचे अधिकार डावलून, ग्रामसेवकांना विश्वासात न घेता, निविदा प्रक्रिया न राबविता वरोरा तालुक्यातील ८१ ग्रामपंचायती, शाळा, प्रा. आ. केंद्रे, अंगणवाड्यांसाठी बाजारभावापेक्षा जास्त दराने साहित्य खरेदी करून ३२ लाखांचा घोटाळा केल्याचा आरोप सोसायटी फॉर फास्ट जस्टीस विदर्भ या संघटने करून संबंधित संवर्ग विकास अधिकाऱ्यांची तक्रार आयुक्तांकडे केली आहे.


-------_--------------_-----------
१५ व्या वित्त आयोगातून ग्रामपंचायतीला आलेल्या निधीचा त्यांच्या आराखड्यामध्ये असलेल्या तरतुदीनुसार ते खर्च करतात. याबाबतची निविदासुद्धा त्यांच्याकडूनच काढली जाते. यात पंचायत समिती किंवा गटविकास अधिकाऱ्यांचा काही सहभाग नसतो. त्यामुळे त्यांनी लावलेले आरोप हे खोटे व चुकीचे आहेत.
Comments