वरोरा शहरातील नवोदय विद्यालय मधील उत्तीर्ण विद्यार्थीचे सुयश

जवाहर नवोदय प्रवेश परीक्षेत ८० विद्यार्थी पात्र

वरोरा तालुक्यात १० विद्यार्थी
अनुराधा यांच्या ट्युशन क्लासेस ९ विद्यार्थी उत्तीर्ण.

चेतन लूतडे वरोरा 

चंद्रपूर जिल्ह्यासाठी केंद्र शासनाच्या जवाहर नवोदय विद्यालयासाठी इयत्ता सहावी साठी घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल घोषित झाला असून यामध्ये जिल्ह्यातील विविध शाळांतील ८० विद्यार्थी पात्र ठरले आहे. यामध्ये वरोरा शहरातून दहा विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये अनुराधा आलमवार यांच्या क्लासेसचे नऊ विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत. दरवर्षी या क्लासेस मधून नवोदय विद्यालयासाठी बरीच मुले उत्तीर्ण होऊन जात असतात. यावर्षी सुद्धा परंपरा कायम राखली असून अनुराधा मॅडमचे पालकांनी आभार व्यक्त केले आहे.

तालुकानिहाय आकडेवारी
चंद्रपूर०३,  भद्रावती०१,वरोरा- १०,चिमूर०६, नागभीड ०२, ब्रह्मपुरी०८, सिदेवाही २७, मुल ०५, सावली ०२, गोंडपिपरी ०३, राजुरा ०३, कोरपणा ०४, बल्लारपूर ०३, पोभुर्णा ०२,जिवती ०१
=एकूण ८०

 तळोधी बा. येथील जवाहर नवोदय विद्यालयासाठी ही परीक्षा घेण्यात आली होती. यासाठी जिल्ह्यातील अनेक विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज भरले होते. परीक्षेच्या निकालानंतर ८० विद्यार्थी पात्र ठरले आहे. या प्रवेशासाठी प्रचंड चुरस असते. परीक्षेतून भाषा, गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी अशा तीन स्तरावर विद्यार्थ्यांची बुद्धिमत्तेचा १०० मार्क चा पेपर घेतल्या जातो. प्रत्येक जिल्ह्यासाठी केंद्र शासनाची ही योजना राबविली जाते.

तालुक्यातील शासकीय जिल्हा परिषद शाळांचा  निकाल अत्यंत कमी असल्याने जिल्हा परिषद शिक्षण विभागाने या तालुक्यांकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. 
खाजगी शाळा व ट्युशन क्लासेस मधील विद्यार्थ्यांनी समाधानकारक कामगिरी केली असून शासकीय शाळांना चिंतन करण्याची गरज आहे.

वरोरा शहरातील अनुराधा आलमवार यांच्या क्लासेस मधील विद्यार्थी.
1.Thorvi  Chaitanya Lutade -St  Anne's high school
2.Shrimayi Mudholkar- St  Anne's high school 
3.Vedashree Deotale-St  Anne's Public school
4.Parnika Chahare-St  Anne's Public school
5.Aditya Meshram-St  Anne's Public school
6.Arnav Hatwar-St  Anne's Public school
लोकमान्य शाळा 
7.Aniket Bhoyar-Lokmanya English Medium School
8.Shlok wakade-Lokmanya English Medium School

दिशा इनोव्हेटिव्ह स्कूल.
9.Purva Sayam-Disha Innovative School
संस्कार भारती
10 Sanskar Bharti public school  . Atharv  P Daware.


जिल्ह्यातील ८० उत्तीर्ण विद्यार्थीची यादी Comments