उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत शुभम चांभारेसह शेकडो युवक कार्येकर्त्यांचा भाजपात प्रवेश

उपमुख्यमंत्री  फडणवीस यांच्या उपस्थितीत शुभम चांभारेसह शेकडो युवक कार्येकर्त्यांचा भाजपात प्रवेश

वरोरा 

 दोन दिग्गजांच्या प्रवेशामुळे राजकारण ढवळले
वरोरा (प्रती )मोदी@9महाजनसंपर्क अभियान दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस व भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता  दि.25जून रोजी आनंदवन चौक वरोरा येथे यांच्या प्रमुख उपस्थितीत युवा कार्येकर्ते शुभम चांभारेसह  शिरीष डहाके,आशुतोष घाटे, शाहरुख पठाण,हर्षल बोंडे, हर्षल डोंगरे, प्रणय चांभारे, साहिल चांभारे, सतीश तडस, प्रफुल  नरडे अक्षय सिडाम,अरबाज खान या शेकडो युवा कार्येकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला.
याच बरोबर जिल्ह्यातील ओबीसी नेते डॉ. अशोक जिवतोडे व मागील विधानसभेतील मनसे चे उमेदवार रमेश राजूरकर यांचाही भाजप प्रवेश झाला आहे. जिल्ह्याच्या राजकारणात राजकीय उलथापालथ होत असतांना दिसत आहे.

  शुभम चांभारे सारखे तडफदार युवा नेतृत्व भाजपाला मिळाल्याने   भाजपच्या गोटातील तरुण युवकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.पक्षाचे ध्येय -धोरण तळागाळातील जनतेपर्यन्त पोहचविण्याचे काम तसंचे पक्षाची संघटनात्मक बांधणी यासाठी अहोरात्र प्रयत्न करीत राहील असा मानस शुभम चांभारे यांनी प्रवेश दरम्यान व्यक्त केला. यावेळी मा.आ.बंटी भांगडीया,मा.आ. पारिणय फुके, बाबा साहेब भागडे, करणभाऊ देवतळे,  अहेतेशम अली, सुरेश महाजन, आशिष ठाकरे , आकाश भागडे, मनीष तुंपल्लीवर,  राजू दोडके,, दिलीप घोरपडे, महेश श्रीरंग, कादर शेख,  जगदीश तोटावार, अभय मडावी, तथा भाजपा/भाजयुमो पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या  संख्येने  उपस्थित होते.

Comments