वरोरा 19/jun23
चेतन लूतडे वरोरा
वरोरा तालुक्यातील सर्वात मोठा बैल बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात अनेक जणांचे खिसे गरम होत आहे.
कृषी उत्पन्न बाजार समिती वरोरा मध्ये सभापती विजय देवताळे उपसभापती जयंत टेंमूर्डे यांची नवीन कार्यकारिणी बसल्यानंतर कर्मचारी व इतर सदस्यांवर वचक नसल्याची बाब समोर येत आहे. रविवारी भरत असलेल्या बैल बाजारामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे प्रत्येक बैलावर एन्ट्री फी पाच रुपये व खरेदीवर 2.10 शेकडा शेष आकारला जातो. यामध्ये साक्षांकन फी , बाजार फी, देखरेख फी असे वर्णन नमूद केले असते.मात्र ह्या पावती व्यतिरिक्त पैसे आकारून कर्मचारी व काही व्यक्तींच्या खिशात अतिरिक्त पैसे जात असल्याची बाप चर्चेत आली आहे. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे नुकसान होत असून याला आळा घालण्यासाठी नवीन सभापतीने लक्ष देणे गरजेचे आहे.
Comments
Post a Comment