डॉक्टरची रंगदारी ,पैसे नाही दिले तर अधिकाऱ्यांना सांगण्याची धमकीव वाळू चालकाने धमकीला भीक घातले नाही.
वाळू चालकाने धमकीला भीक घातले नाही.
डॉ.दाते वर गुन्हा दाखल
Warora
वरोरा तालुक्यातील वाळू घाट चालकांला एका डॉक्टरने धमकावत पैशाची मागणी केली. परंतु या मागणीला भीक न घालत डॉक्टर विरुद्ध खंडणी मागितल्याचा आरोप वाळू चालकाने केला आहे. रंगदारी मागीतल्याची खळबळजनक बाब उघडकीस आली आहे.
29 वर्षीय शुभम चांभारे मागील 4 ते 5 वर्षांपासून रेतीचा व्यवसाय वनी क्षेत्रात करीत आहे. मूळचे वरोरा येथील रहिवासी असून कायद्याच्या चाकरीत राहून आपला व्यवसाय करीत आहे. परंतु याचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न एका डॉक्टरांनी सुरू केला. सतत काही ना काही कारणावरून बड्या अधिकाऱ्याची धमकी देत वारंवार फोन करत असे. मात्र या धमकीला कधीही भीक घातली नाही. भद्रावती येथील डॉ. नरेंद्र दाते यांनी चांभारे यांच्या राळेगाव रिट भद्रावती येथील वाळू घाटावर जात त्याठिकानचे फोटो काढत सुपरवायझर आशुतोष घाटे याला धमकविण्याचे प्रकार सुरू केले होते.मात्र वारंवार होणाऱ्या त्रासामुळे वाळू चालकाने पोलिसांकडे मदत मागितली.
डॉ. दाते हा महिन्याभरापासून चांभारे यांच्या वाळू घाटावर जात त्यांना पैश्यासाठी त्रास देत होता, इतकेच नव्हे तर दाते हा इतरांकडून चांभारे यांना माहिती पाठविण्याचे काम करायचा अधिकाऱ्यांसोबत चांगले संबंध असल्याचे सांगून वाळूवरील कारवाई टाळायची असेल तर सर्व अधिकाऱ्यांना सांभाळण्यासाठी लाख रुपये द्यावे लागतील अशी बतावनी करत होता.
चांभारे यांनी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केले, मात्र 9 जून ला सकाळी 12 वाजेदरम्यान डॉ. दाते यांनी सुपरवायझर घाटे याला कॉल करीत मी कलेक्टर सहित सर्व अधिकाऱ्यांना सांभाळतो त्याकरिता मला आता 32 हजार रुपये RTGS किंवा फोन पे द्वारे ट्रान्सफर करा, माझे लक्ष लॅपटॉप, टॅबलेट द्वारे तुमच्या वाळू उपसणाऱ्या मशीन इकडे असते. तुम्ही तिथे गेल्यावर लगेच मला कळते. परंतु आता मला पैशाची गरज असल्याने शुभम याला तू सांगून दे. या प्रकारचे संभाषण चांभारे यांनी आपल्या मोबाईल मध्ये रेकॉर्ड केले.
त्यानंतर या सर्व प्रकरणाची तक्रार वरोरा पोलीस स्टेशनमध्ये चांभारे यांनी केली, वरोरा पोलिसांनी कलम 385 अनव्ये डॉ. नरेंद्र दाते यांच्यावर गुन्हा दाखल केला.
डॉ. नरेंद्र दाते हे वैधकीय क्षेत्रातील नसून ते PHD धारक असल्याची माहिती आहे. महसूल विभागाची सर्व माहिती लॅपटॉप आणि टॅबलेट द्वारे आपल्या जवळ ठेवतात. ह्या अद्यावत ज्ञान ठेवणाऱ्या डॉ. दाते यांना पोलिसांचा हिसका मिळतात सर्वकाही अद्यावत माहिती व सामग्री बाहेर येण्याची शक्यता आहे
Comments
Post a Comment