परसोडा येथील शेतीतील मांडवाला आग .दोन महिने उलटूनही नुकसान भरपाईसाठी टाळाटाळ

परसोडा येथील शेतीतील मांडवाला आग .
दोन महिने उलटूनही नुकसान भरपाईसाठी   टाळाटाळ

 वरोरा 1जून 2023

        वरोरा तालुक्यातील परसोडा येथील शिवशंकर विठ्ठल आमने या शेतकऱ्याच्या शेतात दिनांक २८/३/२३ रोज मंगळवार ला शेतातील मांडवाला लाईनचा स्पार्क होऊन आग लागली .शेतामधून कृषी पंपासाठी जाणारे तारांचा स्पार्क होऊन शेतातील बैलाचा मांडव जळून राख झाल्याचा आरोप महावितरण कंपनीवर शेतकऱ्यांनी लावला आहे. हे लाईन टाकत असताना शेतकऱ्याची परवानगी सुद्धा घेतली नव्हती. शेतीच्या मधोमध पोल टाकून महावितरण कंपनीने शेतीचे नुकसान सुद्धा केले होते. परंतु शेतकऱ्याच्या तोंडी बोलण्याकडे कंपनी अधिकाऱ्याने  लक्ष दिले नाही. त्यामुळे नाईलाजास्तव व जागा अपुरी असल्याने या विद्युत खांबाजवळ बैलांसाठी मांडव घालावा लागला होता. त्यामुळे महावितरण कंपनीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

मांडवाच्या सभोवताल बैलांचा संपूर्ण चारा कळबा, कुटार व शेतीचे साहित्य, पाईप,ताटवे,फाटे इत्यादी हा आगीत जळून राख झाले आहे. त्यासोबत मांडवात एक गाय व गाईचे पिल्लू बांधून होते. त्या आगीतून गाईला व पिल्ल्याला वाचवण्याकरिता शेतशिवारात काम करणाऱ्या महिलांनी धाव घेतली होती त्यात पिल्याला सुखरूप बाहेर काढण्यात आले. आणि गाईला वाचविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत असताना गाय गंभीर जखमी झाली होती. लगेच गाईला औषध व उपचार करून वाचवण्यात आले लगेच शेतकऱ्यांनी श्री.नितेश आडे वरिष्ठ तंत्रज्ञ (लाईनमेन) यांना संपर्क करून घटनेची माहिती दिली होती. ताबडतोब लाईनमेन व श्री.जे. एस. मेश्राम सहा. अभियंता वरोरा ग्रा.२ हे घटना स्थळी येऊन  त्यानी शेतात येऊन घटनेचा पंचनामा देखील केला. या घटनेत सुमारे अंदाजे ४५ हजार रु. नुकसान झाले होते. ते त्यांनी मान्य देखील केले घटनेला दोन महिने ओलटून गेले.
 परंतु महावितरण कंपनी कडून कोणत्या ही प्रकारची नुकसान भरपाई मिळाली नाही.
 शेतकऱ्यांला बैलाचा टाकण्यासाठी चारा नसल्याने शेतकरी चिंतेत आहे. 
अनेक वेळा उप. अभियंता श्री भोयर  यांचे कडे तक्रार करून सुद्धा दूर लक्ष करत असल्याचे शेतकऱ्यांनी म्हटले आहे. त्यामुळे वरिष्ठांनी याची दखल घेऊन शेतकऱ्याला न्याय देण्याची मागणी गावातील सामाजिक कार्यकर्तेनी केली आहे.

येत्या आठ दिवसात नुकसान भरपाई न मिळाल्यास शेतीतील गुरे वरोरा येथील महावितरण कंपनीच्या दरवाजासमोर बांधण्याचा  इशारा शेतकऱ्यांनी दिली आहे.



किशोर भाऊ आणि वहिनींना लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

मंगेश भाऊ आणि वहिनींना लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

सामाजिक कार्यकर्ते किशोर भाऊ टोंगे यांच्याकडून गरजूंना मदत



Comments