*आमदार प्रतिभा धानोरकर यांचे प्रतिपादन*
चंद्रपूर : रुग्णवाहिका आणि शववाहिकेमुळे नागरिकांची होणारी गैरसोय आता दूर होणार असून रुग्णवाहिकेमुळे रुग्णांना वेळीच उपचारासाठी पोहोचवण्याचे काम या माध्यमातून होईल, असे प्रतिपादन आमदार प्रतिभा धानोरकर यांनी केले.
वरोरा नगरपरिषदेच्या स्थापना दिनानिमित्त 17 मे रोजी आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या निधीतून रुग्णवाहिका आणि शववाहिका यांचे लोकार्पण करण्यात आले.
नगरपरिषद व राज्य स्थापना 17 मे 1867 रोजी झाली होती. या निमित्त 157 व्या स्थापना दिनानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत उभारण्यात आलेल्या ७५ फूट उंच राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण आणि ध्वजवंदन यावेळी पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या.
याप्रसंगी उपविभागीय पोलिस अधिकारी आयुष नोपानी, उपविभागीय अधिकारी शिवनंदा लंगडापुरे, नगर परिषद, वरोरा मुख्याधिकारी गजानन भोयर, संवर्ग, विकास अधिकारी संदिप गोडशेलवार, माजी उपाध्यक्ष अनिल झोटिंग, माजी नगरसेवक गजानन मेश्राम, माजी नगरसेवक प्रदिप बुराण, माजी नगरसेवक छोड़भाई शेख, माजी नगरसेविका मंगलालाई पिंपळकर, माजी नगरसेविका चंद्रकला चिमुरकर यांची उपस्थिती होती.
Comments
Post a Comment