वरोरा तालुक्यातील मर्डा परिसरात वाळूचे अवैध उत्खनन

वरोरा तालुक्यातील मर्डा परिसरात वाळूचे अवैध उत्खनन 

चेतन लूतडे वरोरा
6.41,६मे२३

सध्या वरोरा तालुक्यात वाळूचे भाव गगनाला भिडले असून या व्यवसायात गुंतलेल्या वाळू माफियांनी वर्धा नदीच्या पात्रातून मुजोरीने वाळूचे अवैध उत्खनन सुरू केले आहे.
मार्डा डॅम लगत आठ दहा ट्रॅक्टर मालकांनी संगणमताने अवैध वाळू उत्खन्याचा घाट घातला आहे. यावेळेस हे पाचही ट्रॅक्टर सहा वाजताच्या सुमारास मार्डा डॅम लगत लागून असलेल्या रोड पासून अवैध वाळू नेत आहे.
मात्र या परिसरातील स्थानिक प्रशासन गावातील पोलीस पाटील, आर आय, यांच्या मुखसंतीने ही अवैध वाळू संध्याकाळी सहा वाजताच्या सुमारास राजरोसपणे नेली जात आहे. मार्डा गावातील बालाजी मंदिरा पासून जो रोड गावाबाहेर जातो त्या रोडने हे ट्रॅक्टर जात आहे. यामध्ये वरोऱ्यातील काही ट्रॅक्टर मालकाचा समावेश आहे. ही वाळू सहा हजार रुपये पर ट्रॅक्टर प्रमाणे वरोरा शहरात विकली जाते.
प्रशासनाचा महसूल बुडवून रात्रभर या रस्त्यावर पाळत ठेवून हे ट्रॅक्टर मालक गलेलठ्ठ बनले आहे. कोणी विचारण्याचा प्रयत्न केला तर मात्र दादागिरीची भाषा चालू होते.
या संबंधात अधिक माहिती घेण्यासाठी घटनास्थळावर पोहोचले असता ट्रॅक्टर चालकाची मुजोरी पाहून महसूल प्रशासनाचा धाक नसल्याचे समजते. 
त्यामुळे आता वरिष्ठांनी याकडे लक्ष देऊन संबंधित ट्रॅक्टर चालकांवर कारवाई करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

Comments