*दमदार नेता हरपला : किशोर टोंगे*
कॉलेज जीवनापासूनच राजकीय वाटचालीची चूनुक दाखवणाऱ्या बाळू भाऊंची अशी अकाली एक्झिट होईल असं कधी वाटलं नव्हतं. भद्रावतीपासून कारकीर्दीची सुरुवात करणाऱ्या बाळूभाऊंनी अल्पावधीतच राजकारणात आपला वेगळा ठसा उमटवला होता. एक शिवसैनिक म्हणून जिल्हाप्रमुख पदापर्यंत पोहोचले. २०१४ मध्ये भद्रावती-वरोरा विधानसभा क्षेत्राचे आमदार झाले. आमदार असताना यशस्वी कारकीर्द सुरू असताना आमदारकीचा राजीनामा देऊन लोकसभा लढले व २०१९ च्या लाटेत काँग्रेसकडून महाराष्ट्रातून एकमेव खासदार म्हणून निवडून आले. आपल्या स्व:कर्तृत्वाने राजकारणात आपली वेगळी ओळख निर्माण केली. अत्यंत कमी वयात त्यांनी हे यश संपादित केले होते. पुणे येथे जेव्हा-जेव्हा आले असता ते मला नेहमी भेटायचे. त्यांचा असा अकाली अंत होईल हे कधी वाटले नव्हते. पण कदाचित नियतीला हे मान्य नसावे. नागपूर येथे उपचार घेतले व त्यानंतर दिल्लीला हलवले. पण तिथे त्यांची अखेरची प्राणज्योत मालवली. त्यांच्या जाण्याने एक कणखर, दमदार नेता जिल्ह्याने व या महाराष्ट्राने गमावला. धानोरकर कुटुंबीयांना या दुःखांतून सावरण्याची शक्ती प्रदान करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना..!
- किशोर टोंगे
Comments
Post a Comment