पंधरा दिवसापूर्वी वरोरा शहरातील एका घरातून तीन तोळे सोने गायब

 वरोरा शहरातील एका घरातून तीन तोळे सोने गायब
शासकीय लाभ देण्याच्या बहाण्याने घूसले घरात

वरोरा
चेतन लूतडे 

वरोरा शहरातील गजानन नगर येथे दोन युवक दुपारी घरावर शासकीय योजनेतून पाण्याची टाकी लावावयाचे आहे याकरिता घरात आले त्यांनीच कपाटातून तीन तोळे सोने लंपास केल्याची तक्रार पंधरा दिवसांनी वरोरा पोलीस स्टेशन मध्ये करण्यात आली.
चार मे रोजी वरोरा शहरातील गजानन नगर मध्ये राहणारे मधुकर धोपटे यांच्या घरी दुपारी दोन लोक आले त्यांनी पंतप्रधान किसान योजनेअंतर्गत आपल्या घरी टाकी मंजूर झाली असून ते लावण्याची जागा बघावयास घरात शिरले जागा बघितली व ते निघून गेले पंधरा दिवसांनी मधुकर धोपटे यांनी कपाटात बघितले असता सोने आढळून आले नाही. त्यामुळे त्यांनी पंधरा दिवसांनी वरोरा पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दिली
चोरी झाल्यानंतर पंधरा दिवसांनी तक्रार प्राप्त झाली त्याची चौकशी सुरू केली आहे
अमोल काचोरे पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन वरोरा पुढील तपास करीत आहे.

Comments