खासदार बाळूभाऊ धानोरकर यांचे आकस्मिक निधन


खासदार बाळूभाऊ धानोरकर यांचे आकस्मिक निधन

वरोरा 
पंडित लोंढे 

 सुरेश उर्फ बाळूभाऊ नारायनराव धानोरकर
माजी आमदार ७५ वरोरा-भद्रावती निर्वाचन क्षेत्र.
विद्यमान खासदार,१३ चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्र.यांचा संघर्षमय संक्षिप्त जीवनपट.
_______________________________
 *सन्मानणिय बाळूभाऊं धानोरकर* हे १३ व्या विधानसभेत *७५-वरोरा-भद्रावती* तसेच चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्र. प्रस्थापित *घरंदाज,राजकीय वारसाप्राप्त मोठ्या कारकिर्दीला छेद देत* *आमदार* म्हणून जनतेच्या निर्विवाद आशादायी कौलाने विजयश्री खेचून आणण्यात *सन २०१३ मध्ये* यशस्वी. _______________________

♦* आदरनिय.नारायनरावजी धानोरकर जिल्हा परिषद प्राथ.शिक्षक.यांचे परिवारात जन्म. शिक्षकी संस्कार,शिस्त,व काटेकोर नियोजन करण्याचे कौशल्य वडिलाकडून प्राप्त.

♦ आई आदरणिय वत्सलाबाई, अत्यंत सोज्वळ,मनमिळावू व्यक्तीरेखा,समाजसेवेत स्वतःला झोकून देणा-या व गरजूंच्या हाकेला धावून जाणा-या संवेदनशिल मनाच्या सामाजिक कार्यकर्त्या.विशेष म्हणजे महिलांना नेहमी आधार व विश्वास देणारी माऊली.

♦ मान सौ.प्रतिभाताई बाळुभाऊ धानोरकर ह्या यशस्वी सहचारिणी ज्या भाऊंच्या राजकीय वाटचालीच्या शिलेदारच नव्हे तर एक अतूट भाग बनल्या.महिला संघटन व ग्रामिण कार्यकर्त्यांना जुळवून ठेवण्याची प्रतिभाताईंची हातोटी भाऊंसाठी खरं तर एक वरदान शिडीच ठरली.

♦ मान.अनिलभाऊ नारायणराव धानोरकर जेष्ठ बंधू ,भद्रावती नगरपरिषदेचे विद्यमान नगराध्यक्ष तथा जिल्हाप्रमुख शिवसेना चंद्रपूर.संपूर्ण महाराष्ट्रात विकसनशिल नगरपरिषद म्हणून मान.बाळूभाऊंच्या मार्गदर्शनात लौकिक.ही नगरपालिका अनेक पुरस्कारांनी  पुरस्कृत राहिली.स्वतःला व आपल्या भावाला संपुर्ण आधार ,प्रोत्साहन देण्याचं कार्य अनिलभाऊंनी केलं,आजही करित आहे.एक यशस्वी व सोज्वळ,प्रेमळ,संयमी,नेतृत्व म्हणून भद्रावती न.प.व तालूक्यात सुपरिचित आहे.अनेक गोरगरीब दीन दुबळ्या शेतकरी शेतमजूर,कष्टकरी जनतेशी त्यांची भावनिक नाळ जुळलेली आहेत.त्यामुळे अनिलभाऊंचा जनसंवाद बाळूभाऊंच्या राजकीय वाटचालीस खूप-खूप उपयोगी झाला.

♦ सामान्य शिवसेना कार्यकर्ता, शिवसेना उपजिल्हाप्रमुख, त्यानंतर जिल्हाप्रमुख ह्या पदानंतर सन २०१३ मध्ये आमदार,सोबतच आता १३-चंद्रपूर-आर्णी लोकसभा क्षेत्र संपर्क प्रमुख इ.यशस्वी जबाबदारी पाडली.पुढे या लोकसभा क्षेत्रावर आपल्या संपर्कातून नक्कीच पकड निर्माण करणार आहे.व ती केली. त्यांच्या संपर्कांनी विद्यमानांना घाम फुटला.सन २०१९ च्या सार्वत्रीक निवडणूकीत काँग्रेसचे उमेदवार म्हणून निवडणूक लढविली,उत्तम नियोजन व राजकीय डावपेचाची योग्य हाताळणी व हातोटीने विजयश्री खेचून आणली.संपुर्ण महाराष्ट्रात मोदी लाट असतांना काँग्रेसचे पानिपत होत असतांना एकमेव खासदार म्हणून निवडून आले.महाराष्ट्रातील काँग्रेसचे एकमेव लोकसभा सदस्य म्हणून संपुर्ण महाराष्ट्रातून एकमेव विजयी खासदार म्हणून इतिहास रचला.त्यांची दमदार कार्यशैलीतून लोकसभेतील प्रवेश अनेक राजकीयांच्या इच्छाशक्तीची भंबेरी उडविणारा राहिला.

 बाळुभाऊ धानोरकर चंद्रपूर जिल्ह्यातील सामान्यांचे सामान्यातुन निर्माण झालेलं व्यक्तीमत्व.ज्यांनी आपल्या चालू शैक्षणिक वयातच एक छोटेसे कापड दुकान थाटून व्यवसायाची सुरुवात केली,बंड करुन परिस्थितीशी दोन हात करण्याचे बळ बाळगणारी सदैव इच्छाशक्ती.तिथून कुटूंबात बंड करुन वाहन खरेदी फायनंस कपनी उभी केली. आणि पुढे त्यांचा व्यावसायिक दृष्टी व्यापक झाली,त्याला जोड न.प.भद्रावती चे स्थानिक राजकारणातून सुरुवात.त्यांचे नेतृत्व हे एक युवावर्गाला खरं तर प्रेरक ठरले.

जात,धर्म,वंश या भिंती तोडून माणुस जोडणारं नेतृत्व म्हणून सिद्ध झालं.राजकीय पक्षाच्या भिंती तोडून विस्तारवादी भुमिकेतील त्यांच्या भुमिका ह्यात कार्यकर्ते जोडण्यात हातखंड राहिला.विरोधी कार्यकर्त्यांची कामे त्याच तळमळीने कोणताही आकस मनात न आणता प्राधान्याने करून देण्यात नेहमी आघाडीवर राहीले,परिणामी शरीराने नव्हे तर त्यांच्या मनातून विरोधकांना जोडले.याचा परिणाम असा झाला की  त्यांना राजकीय रणसंग्रामात पडद्याआडून अनेकांचे आशिर्वाद मिळाले.ही किमया अनेक राजकीय विष्लेषकांना भुरळ पाडणारी ठरली.

शेतकरी,शेतमजूर,कामगार,मजूर,कर्मचारी यांच्या समस्या कोणत्याही घटकाला भावनिक दुखापत न होता चुटकीनीशी आपल्या स्टाईलने निकाली काढण्याचे कौशल्य ही त्यांची जमेची बाजू ठरली आणि आजही टिकवून आहे.

मान.बाळूभाऊंनी केलेला दुरध्वनी असो की दिलेला आंदोलनाचा ईशारा असो,म्हणचे समस्या निकाली निघण्याची नांदी असते.हे सिद्ध झाले.व जनता ते अनुभवते आहे

 कोणताही राजकिय वारसा नसतांना आमदार पदापर्यंत मजल.पुढे त्यांच्या कार्याची पावती म्हणून काँग्रेस प्रवेश,पक्षश्रेष्ठींनी चंद्रपूर लोकसभा क्षेत्राची जबाबदारी दिली,त्यातून पुढे विरोधकांचा विरोध म्हणून नाईलाजास्तव,कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव "भारतीय राष्ट्रीय कांग्रेस" पक्षात प्रवेश घेऊन उमेदवारी मिळविण्यातील संघर्ष जनतेनी अनुभवला. त्या संघर्षात लोकसभा लढले व मोठ्या बहुमताने निवडून आले,खासदार झाले पण एक नवा इतिहास रचून.काँग्रेसला भाजपाने महाराष्ट्रात चारी मुंड्या चीत केले पण महाराष्ट्रातील काँग्रेसचे एकमेव खासदार म्हणून निवडून आले.यांच्या विजयाने पक्षश्रेष्ठीना व तमाम काँग्रेसी धुरिणांना भुवया उंचावयास लावल्या.पक्षाने दिलेली उमेदवारी व पक्षांतर्गत विरोधकांना भाऊंनी आपल्या ऐतिहासिक विजयातून चांगलीच चपराक दिली. भाऊ चंद्रपूर-आर्णी लोकसभा क्षेत्राचेच नव्हे तर सबंध महाराट्राचे एकमेव काँग्रेस नेतृत्व म्हणून संसदेत कणखर विरोधक म्हणून भुमिका बजावित आहे.एक नवा इतिहास रचला आहे.

      सौ.प्रतिभा वहिणींना विधानसभेची उमेदवारी आणि बाळूभाऊ

 स्वतःच्या आमदारकीच्या राजीनाम्यानंतर लागेच तीन महिण्यांनी विधानसभेच्या रणधुमाळीचा बिगुल वाजला.भाऊंसमोर उमेदवारीचा पेच होता.अशावेळी प्रस्थापित विरोधकाला व त्या सबळ उमेदवाराला शह देणारा उमेदवार स्थाणिक पक्ष कार्यकर्त्यात दिसला नाही.शेवटी सहचारिणी प्रतिभाताईंना रणांगणात उतरण्यासाठी तयार केले.प्रखर विरोध असतांना सुद्धा प्रतिभाताईंचा मतदार संघातील शेवटच्या घटकापर्यंत असलेला संपर्क,जुळलेली भावणिक नाळ यातुन तसेच भाऊंचे काटेकोर महत्वाकांक्षी नियोजन या बळावर काँग्रेस ला यश मिळाले.आज प्रतिभाताई धानोरकर ह्या यशस्वीपणे,प्रगल्भ राजकारण्याइतपत असलेल्या पात्रतेत ख-या उतरत ७५ वरोरा- भद्रावती विधानसभा मतदार संघाचे नेतृत्व करताहेत.ह्या विजयाचे सारे श्रेय बाळुभाऊंच्या प्रगल्भ इच्छाशक्ती,नियोजन व महत्वकांक्षेला जाते.

एक सामान्य कार्यकर्ता,आमदार,आणि आता ४ वर्ष खासदार.

 जनसेवेसाठी व जनतेवरिल होत असलेल्या अन्यायावर अनेक यशस्वी जनआंदोलन करणारं नेतृत्व म्हणून सर्वदूर परिचीत.

 प्रसंगी जनतेच्या सेवार्थ अनेक गुन्हे दाखल झालेत तरी तमा न बाळगणारं,न डगमगणारं, सामान्यांच्या विश्वासास पात्र असं नेतृत्व.

आंदोलने - आजवर अनेक आंदोलने शिवसेना स्टाईलने यशस्वी केलेत.त्याच दमाने आणि त्याच हातोटीने आज ज्या काँग्रेस पक्षात आहे त्या पक्षात ते आपल्या राजकीय मर्यादा सांभाळीत नेटाने लोकहितकारी जनसेवेचे कार्य भाऊंचे सुरू आहे.

महिला व त्यासाठी भाऊंचे कार्य
महिलांना योग्य सन्मान मिळावा,त्यांना एक मंच प्राप्त व्हावा ,योग्य सन्मान देण्यासाठी,कलागुणांना संधी उपलब्द करून देण्या साठी,"भाऊचा दांडीया" (गरबा) उपक्रम हळदीकुंकू,भजन स्पर्धा , महिला पुरुष कबड्डी स्पर्धा इत्यादी. उपक्रम नियमित दरवर्षी सूरू आहेत.

युवावर्ग व भाऊ
युवा व खेळाडूंसाठी कबड्डी स्पर्धा, व योग शिबीरांचे सार्वजणिक स्तरावर आयोजन,योगमंडळे,व्यापारी संघ,खेळाडू प्रशिक्षीक,क्रिडा अकादमी,तसेच तयार झालेले संबंध जोडून व कायम जपून ठेवण्यासाठी स्वतः व कार्यकर्त्याच्या माध्यमातून अहोरात्र जनसंपर्कात असतात. यात भाऊंनी जवळीकता निर्माण करून आपलेसं केले.त्याचा फायदा भाऊंना राजकीय आखाड्यात करुन घेता आला.

वरोरा भद्रावती दोन्ही तालूक्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यात निर्विवाद वर्चस्व मिळवून आजवर शेतक-याना न्याय देण्यात यशस्वी झाले,अनेक ग्राम पंचायतीना भाऊंनी विरोधकांकडून आपल्या पक्षाकडे हिसकावण्यत ते यशस्वी राहीले.कृ.उ.बाजार समिती वरोरा चे मैदान सौदर्यीकरण करुन ७६ गाळ्यांची उभारणी करुन आज विक्रिसाठी तयार केलीत.

आजवर *सन्मानणिय खासदार बाळूभाऊ धानोरकर* हे शहरी व ग्रामिण विकासाचे महामेरू ठरले आहे. एक ना अनेक विकासकामांचे शिलेदार म्हणून,युवा वर्गाचे प्रेरणास्थान म्हणून युवकांच्या हृदयात वसले आहेत.जनतेच्या विश्वासास पात्र  ठरलेले आहे.

▪️ दि. ४ जुलै,भाऊंचा वाढदिवस.याप्रसंगी ते जनसेवेची अखंडित सेवा सुरु करण्यातची शपथ घेत आपला वाढदिवस जनसामान्यात साजरा करणारं दिशादर्शक हे व्यक्तीमत्व.
------------------------------------------ 
*दुःखद बातमी -*वडील स्व.नारायणराव धानोरकर यांचे दि.२७ मे २०२३ ला वृद्धपकाळाने निधन.

 बाळूभाऊ या वादळाचा अंत.-
काळाचा आकस्मिक घाला- सन्मा. बाळुभाऊ धानोरकर यांचे आकस्मिक निधन, वादळ कायमचं विसावलं,
      आज दि.३० मे २०२३ सकाळी ठिक 3-00 ला  हाँस्पीटल,नवी दिल्ली येथे आकस्मिक त्यांचे निधन  झाले.या पहाटेच्या आकस्मिक बातमीने झोपा उघडल्या.ही बातमी मनाला चटका लावून गेली.अशा या धडपड्या युवा नेतृत्वाचा काळाने अचानक घाला घालून चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील जनतेला अर्ध्यावर सोडून निघून गेले. आपला संपुर्ण परिवारावर आलेले हे दुसरं भयावह संकट यातून समस्त परिवारास बाहेर पडण्याची शक्ती आपणात ईश्वर प्रदान करो या प्रार्थनेसह भाऊंच्या आत्म्यास चिरशांती लाभो,हिच ईशचरणी प्रार्थणा...!!
भावपुर्ण श्रद्धांजली !


* खासदार धानोरकर यांच्या मृत्यूमुळे चंद्रपूर जिल्ह्याचे  धाडसी, लढाऊ व खंबीर नेतृत्व हरपले* 
*शिवसेना जिल्हा प्रमुख मुकेश जिवतोडे यांची प्रतिक्रिया* 

वरोरा : *धाडसी माणूस भीत नाही आणि आणि  भिणारा माणूस धाडस करित नाही. परंतु धाडस केल्याशिवाय कोणालास काही मिळत नाही हे निर्विवाद सत्य आहे. खासदार बाळूभाऊ धानोरकर हे त्यापैकीच एक होते .चंद्रपूर जिल्ह्याचे धाडसी, लढाऊ व खंबीर नेतृत्व युवा खासदार बाळूभाऊ धानोरकर  यांच्या मृत्युने हरपले आणि चंद्रपूर जिल्हा पोरका झाला अशी प्रतिक्रिया शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे यांनी खासदार बाळू धानोरकर यांच्या दुःखद निधनावर दिली आहे. 

 चंद्रपूर जिल्ह्यातील भारदस्त लढाऊ युवा उंमद व्यक्तिमत्व ,राजकारणातील अभिमन्यू , विकास कामाला गती देण्यासाठी सदैव कुठल्याही पातळीवर सक्षम नेतृत्वासी दोन हात करण्यास तत्पर असणाऱ्या महाराष्ट्रातील काँग्रेसचे एकमेव चंद्रपूर -यवतमाळ जिल्ह्याचे खासदार बाळूभाऊ धानोरकर या युवा नेतृत्वाला चंद्रपूर जिल्हा आता पोरका झाला आहे . असं राजकारणातील नेतृत्व चंद्रपूर जिल्ह्याला पुन्हा होणे नाही.

या शब्दात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख मुकेशभाऊ जिवतोडे यांनी आपल्या शोक संदेश पर भावना व्यक्त केल्या आहेत.Comments