अरबिंदो कोळसा खदानीच्या संबंधात असलेली अधिकाऱ्याची बैठक शेतकऱ्यांनी हाणून पाडली.

अरबिंदो कोळसा खदानीच्या संबंधात असलेली अधिकाऱ्याची बैठक शेतकऱ्यांनी हाणून पाडली.

वरोरा
चेतन लूतडे 
भद्रावती तालुक्यातील बेलोरा टाकळी परिसरात अरविंदो रियालटी इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड खाणीसाठी 936हे. जमीन संपादित करण्यासाठी बुधवारी कार्यालयीन बैठक बोलवण्यात आली. मात्र वरोरा येथील उपविभागीय कार्यालयात असलेली बैठक गावकऱ्यांनी हाणून पडली. यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी उपविभागीय कार्यालयात दाखल होऊन शेतकऱ्यांच्या मागण्याविषयी अधिकाऱ्यांकडे तगादा लावल्याने बैठक रद्द करावी लागली. 

चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोळसा खदान सुरू असून मागील कंपनीचे व्यवहार पाहता येथील शेतकऱ्यांनी पहिले एकरी 50 लाख रुपये देण्याची मागणी करत  कंपनीचे काम थांबवण्यात आले. मध्यस्थी मार्ग काढण्यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे दोन प्रतिष्ठित नागरिक व कंपनी यांची भूसंपादन करण्यासाठी बैठक करण्यात आली होती. मात्र शेतकऱ्यांना हे मान्य नसल्याने बैठकी गावकऱ्यापुढे व्हावी अशी मागणी करत कंपनी अधिकाऱ्यांकडे घेराव घालण्यात आला .त्यामूळे तणावाची स्थिती निर्माण झाली होती.

कंपनीच्या अधिकारी वीरेंद्र सिंग यांनी गावकऱ्यांसोबत संगणमतीने काम करण्याचे आव्हान केले असून अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार गावकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यात येईल असे सांगितले.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 

Comments