बनावट सोने तारण ठेवून इसाफ़ बँकेची ५४ लाखांनी फसवणूक *तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल.

बनावट सोने तारण ठेवून इसाफ़ बँकेची ५४ लाखांनी फसवणूक 

*तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल *

वरोरा
चेतन लूतडे 

ईसाफ स्मॉल बँक फायनान्स शाखा वरोरा चे व्यवस्थापक फिर्यादी यांना व कर्मचारी यांना आरोपि क्रमांक 1 भूषण झीले ह्यानें दोन्ही आरोपिसोबत कट रचून विश्वासात घेऊन सोलर कंपनी चा मालक असल्याचे सांगून खोट्या सोनाराचे दुकानातील बिल पावती दाखवून बनावटी सोन्याचे दागिने ज्यामध्ये 69 बांगड्या व वेटोळे असलेले रिंग 41(  अंगठी) एकुण 1327.38 ग्राम बनावटी सोने बँकेत तारण ठेऊन एकुण 10 गोल्ड लोन केसेस करून एकुण 54,49,000/रुपयांची बँकेची आर्थिक फसवणुक केल्याचा प्रकार उघडकीस आला.

नागपूर-चंद्रपूर महामार्गावरील विनायक लेआउट परिसरात असलेल्या इसाफ स्मॉल फायनान्स बँकेमध्ये वरोरा येथील भूषण ज्ञानेश्वर झीले, संदीप गंधारे आणि येन्सा येथील नरेश दुधगवळी यांनी ९ मार्च २३ ते ८ मे २३ दरम्यान १० वेगवेगळ्या सोने तारण कर्ज योजनेत सोन्याचे दागिने तारण ठेवून ५४ लाख ४९ हजार रुपयांचे कर्ज उचलले. परंतु जेंव्हा सदर बँकेचे ऑडिट अधिकाऱ्यांनी केले तेव्हा सदर सर्व दागिने सोन्याचा मुलामा चढविलेले  बनावट दागिने असल्याचे आढळून आले. त्यामुळे दि.१८ मे२०२३ रोजी बँकेच्या व्यवस्थापकांनी वरोरा पोलीस स्टेशनला याबाबत तक्रार दिली. तक्रार दाखल होताच पोलिसांनी चौकशी करून आज २० मे रोजी तीन आरोपीविरुद्ध ४१७, ४२०,४६७, ४६८, १२० (ब) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. परंतु तिन्ही आरोपी फरार असल्याने वृत्त लिहितपर्यंत त्यांना अटक झालेली नव्हती. सदर प्रकरणाचा तपास वरोरा पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज बोंडसे करीत आहे.

त्यामुळे खाजगी बँकेतील सोने तारण योजनेतील सोने तपासणीचे काम मोठ्या प्रमाणात सुरू असल्याची चर्चा आहे. बँकेमध्ये सोने तारण ठेवण्यासाठी सोनाराची नियुक्ती केली जाते. मात्र या ठिकाणी ती नव्हते. याची माहिती घेण्यासाठी भ्रमणध्वरीवर संपर्क साधला असता माहिती देण्यास व्यवस्थापकाने नकार दिला. याचाच फायदा घेत आरोपीनी बँकेला फसविले असावे असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दहा वेळा तारण योजनेत सोने तपासूनच गहाण ठेवण्यात आले होते तरीपण बँकेच्या लक्षात आले नाही हे विशेष.

Comments