शूल्लक कारणावरून युवकाची हत्या

शूल्लक कारणावरून युवकाची हत्या

वरोरा
चेतन लूतडे 

वरोरा शहरालगत लागून असलेल्या फुकट नगर या परिसरात एका युवकाचा त्याच्याच मित्राने काठीने मारहाण करून  हत्या करण्यात आल्याची घटना   सकाळी नऊ वाजताच्या सुमारास उघडकीस आली .
 मृतक रितेश रामचंद्र लोहकरे वय २० वर्ष, राहणार विकास नगर वरोरा हा महाविद्यालयीन शिक्षण घेत होता. स्वभावाने शांत असल्याने त्याचे कोणी शत्रूही नव्हते. मात्र असे काही घडले की आरोपी अनिमेश संजय रेड्डी वय २२ राहणार विकास नगर  यांनी फोन करून पान ठेवल्यावर बोलूवून घेतले.व दोन दिवसांपूर्वीचा राग काढत काठीने मारहाण करून जाग्यावर ठार मारले. यानंतर तो त्या जागेवरून पसार झाला होता.

घटनेची माहिती मिळताच प्रभारीउपविभागीय पोलीस अधिकारी शेखर देशमुख पोलीस निरीक्षक अमोल काचोरे आदींनी घटनास्थळी धाव घेतली आणि घटना स्थळाचा पंचनामा करून मृतदेह तातडीने वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविला.

वरोरा पोलीस निरीक्षक अमोल काचोरे
संध्याकाळी पर्यंत चंद्रपूर गुन्हे शाखा व वरोरा पोलिसांनी कसून शोध घेत आरोपीला नागपूर वरून ताब्यात घेण्यात यश आले. दोन दिवसापूर्वी दोघांमध्ये भांडण होऊन आज त्याचा वचपा काढण्यात आला असे प्रथम दर्शनी कारण पोलिसांच्या समोर आले असून नेमके कोणत्या कारणावरून भांडण झाले याचे कारण कळू शकले नाही.त्या दिशेने चंद्रपूर गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी व पोलिस निरीक्षक काचोरे  त्यांची टीम तपास करीत आहे.

Comments