वरोरा : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)जिल्हा प्रमुख मुकेश जिवतोडे व युवासेना जिल्हा प्रमुख मनीष जेठानी यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसैनिक माजी सरपंच आटमुर्डी विठ्ठल जोगी यांच्या नेतृत्वात आटमुर्डी ग्रामपंचायतच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार निवडुन आले.
यात शिवा राजु वराटकर यांनी मोहन साळवे यांचा ४० मतांनी तर
तसेच प्रेमीला जयदेव लभाने यांनी भूपेंद्र लभाने यांचा ४० मतांनी पराभव करून विजय प्राप्त केला.
यावेळी निवडुन येणाऱ्या दोन्हीही उमेदवारांचे शिवसेना जिल्हा कार्यालय वरोरा येथे शिवसेना जिल्हा प्रमुख मुकेश जिवतोडे यांच्या हस्ते शाल श्रीफळं व पुषगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
सदर कार्यक्रमाला युवासेना जिल्हा प्रमुख मनिष जेठानी, शिवसेना उपजिल्हा प्रमुख अमित निब्रड, शहर प्रमुख संदीप मेश्राम, युवासेना जिल्हा सनमव्यक दिनेश यादव, शिवदुत बंडुजी डाखरे,शिवदुत रामशोक दडमल, शिवसेना विधानसभा मीडिया प्रमुख गणेश चिडे, उपतालुका प्रमुख लक्ष्मण ठेंगणे, जेष्ठ शिवसैनिक पुण्यवान तुराणकर, युवासेना उपतालुका प्रमुख अक्षय झिले, शिवसेना उपशहर प्रमुख राहुल दारुण्डे, अनिल गाडगे, अतुल नांदे,गजानन बोढे,प्रवीण खिरटकर,रवींद्र लभाने,वैभव वराटकर,आकाश पाकमोडे, चेतन साळवे, अनिकेत उईके, राजेंद्र पाकमोडे, अमित खारकर, अतुल किन्नाके आणि पदाधिकारी, शिवसैनिक, युवासैनिक उपस्थित होते.
आटमुर्डी ग्रामपंचायतवर सरपंच पदाचे उमदेवार म्हणून शिवा राजु वराटकर यांची वर्णी लागणार तसेच पुढे येणाऱ्या निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकवणार असा विश्वास शिवसेना जिल्हा प्रमुख मुकेश जिवतोडे यांनी व्यक्त केला .
जाहिरात
Comments
Post a Comment