परिवर्तन आघाडी पॅनलची सत्ता ईश्वररुपी आयुषने तारली. सभापती डॉ. विजय रामचंद्र देवतळे तर उपसभापती जयंत मोरेश्वर टेमुर्डे

परिवर्तन आघाडी पॅनलची सत्ता  ईश्वररुपी आयुषने तारली.

सभापती डॉ. विजय रामचंद्र देवतळे तर उपसभापती जयंत मोरेश्वर टेमुर्डे

वरोरा १२/३/२३
चेतन लूतडे 
 वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीवर शेतकरी सहकार परिवर्तन आघाडी पैनलची सत्ता ईश्वर कृपेने अखेर  बसली.  सभापती डॉ. विजय रामचंद्र देवतळे तर उपसभापती जयंत मोरेश्वर टेमुर्डे यांची निवड झाली.
स्थानिक वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक दि. २९ एप्रिल रोजी पार पडली होती. त्यानुसार शेतकरी सहकार परिवर्तन आघाडी पैनलचे ९ उमेदवार, खासदार बाळू धानोरकर व आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या पॅनलचे ८ उमेदवार तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचा एक उमेदवार असे एकूण १८ उमेदवार निवडून आलेले होते. स्पष्ट बहुमत कोणत्याच पैनलला प्राप्त झाले नाही. शेवटी आज (दि. १२) ला एकनाथ शिंदे गटाचा उमेदवार नितीन मत्ते हा धानोरकर गटाला जावून मिळाल्याने दोन्ही पैनल कडे समान सदस्य संख्या झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी एस सन्धू यांनी ईश्वर चिट्ठीचा प्रस्ताव दोन्ही गटाकडे ठेवण्यात आला. तो मान्य झाल्यानंतर ईश्वर चिट्ठी काढण्यासाठी एका लहान मुलाला बोलवण्यात आले. त्याचे नाव होते आयुष अरुण तुंबळे वय १८ वर्ष सध्या तो इडली दोसाचे दुकान सांभाळतो. आयुष्यभर कष्टाचेच जीवन तो जगात आलाय. मात्र एका मिनिटात ईश्वर रुपेने जिल्ह्यातील लक्षवेधी व अटीतटीच्या निवडणुकीचा निकाल त्याच्या कष्टकरी हातून निघेल आणि कोणाचे तरी भाग्य उजळेल हेही त्याच्या ध्यानीमनी नव्हते. गोंधळलेल्या या मुलाने क्रमाक्रमाने दोन चिठ्ठ्या काढल्या. 
आणि सत्तारूढ असलेल्या गटाचे नशीब पलटवले.
आणि परिवर्तन पॅनल आघाडीचे भाग्य उजळले. यामध्ये सभापती म्हणून डॉक्टर विजय देवतळे आणि उपसभापती म्हणून श्री जयंत टेंमूर्डे यांचे भाग्य आयुषच्या कष्टकरी हातातून उजळले.

तर दुसरीकडे ऑटो चिन्हवर एकनाथ शिंदे गटाचे  नितीन मत्ते यांना उपाध्यक्ष पदाचे प्रलोभन मिळाल्यामुळे ऐनवेळी काँग्रेस गटाकडे जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळेच दोन्ही बाजूची सदस्य संख्या नऊ नऊ झाल्याने अत्यंत अटीतटीची व चूरशीची स्थिती निर्माण झाली. मात्र एका लहानशा मुलाच्या रूपाने मागील वर्षी काँग्रेसच्या सत्तेला विरोधात बसायला भाग पाडले.

 तर उर्वरीत संचालक मंडळात शेतकरी सहकार परिवर्तन आघाडी पैनलचे संचालक दत्ता बबनराव बोरेकर, विठ्ठल त्र्यंबक भोयर, अभिजित गिरीधर पावडे, सौ. कल्पना ओकेश्वर टोंगे, सौ. संगिता वासुदेव उरकांडे, राजेश वामनराव देवतळे, विलास शालिक झिले यांचा समावेश झाला आहे.

यानंतर जिल्हा परिषद आणि नगरपालिका या निवडणुका संभावित असून या निवडणुकीचा फटका कोणत्या उमेदवाराला बसतो हे काळच ठरवेल. 
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Comments