प्रेम प्रकरणातून होणारा बालविवाह रोखण्यात वरोरा पोलिसांना यशफेसबुकच्या माध्यमातून झाली होती ओळख.

प्रेम प्रकरणातून होणारा बालविवाह रोखण्यात वरोरा पोलिसांना यश
फेसबुकच्या माध्यमातून झाली होती ओळख.

वरोरा : तालुक्यातील निलजई येथे मंगळवार दि. २५ एप्रिल रोजी अल्पवयीन मुलगा आणि वयात आलेल्या मुलीचा होणार असलेला बालविवाह  थांबविण्यात वरोरा पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या सतर्कतेने यश आले.

जाहिरात 
    सामाजिक कार्यकर्ते किशोर भाऊ टोंगे 
 वरोरा तालुक्यातील निलजई येथे मंगळवार दि २५ मे रोजी अल्पवयीन मुलाचा वयात आलेल्या मुलीशी प्रेम विवाह विवाह होत असल्याची गोपनीय माहिती वरोरा पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार पोलिस निरीक्षक अमोल काचोरे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक रविंदसिंह परदेशी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनात महिला  समुपदेशक योगिता लांडगे यांना सोबत घेऊन पोलीस पथकासह निलजई गाव गाठले. आणि बेकायदेशीर रित्या प्रेमविवाह होणार असलेल्या वर मंडपी धडक दिली.यावेळी तिथे लग्न कार्याची लगबग सुरू होती.पोलिसांना पाहून सर्वांची तारांबळ उडाली. 
दरम्यान पोलीस निरीक्षकांनी वधू आणि वर यांचे वयाचे दाखले मागितले.तेंव्हा वर मुलास २१ वर्ष पूर्ण व्हायचे असल्याचे दिसून आले. यानंतर महिला समुपदेशक योगिता लांडगे आणि पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांनी बालविवाह झाल्यास होणाऱ्या कायदेशीर कारवाईची माहिती मुलाच्या पालकांना , मुलीला आणि उपस्थित ग्रामस्थांना दिली.तसेच अल्पवयीन मुलास बालकल्याण समिती समोर हजर करण्याच्या सूचना देण्यात आल्या.यानंतर सदर विवाह रद्द करण्यात आला. आता हा विवाह मुलाचे वय २१ वर्ष पूर्णझाल्यानंतर केला जाणार आहे. दरम्यान वधू होणार असलेली मुलगी ही रायगड येथील असल्याची आणि तिथे तिच्या पालकांनी तिच्या बेपत्ता होण्याची तक्रार पोलिसात दिली असल्याचे पोलीस चौकशीतुन पुढे आले. या मुलासोबत फेसबुक वरून ओळख झाल्याची कबुली देली. परंतु मुलगी सज्ञान असून तिचे व संबंधीत मुलाचे एकमेकांवर प्रेम असल्याचे दोघांचे म्हणणे आहे. परिणामी मुलीवर रायगड येथे घरी जाण्यासाठी आग्रह धरला जाऊ शकत नसल्याने ति तिच्या संमतीने निलजई येथे त्या मुलाच्या घरीच वास्तव्यास आहे हे विशेष.


Comments