दत्ता बोरेकर यांच्या प्रकरणात रवींद्र शिंदे यांची 'शिवालय' येथे पत्रकार परिषद

*दत्ता बोरकर यांचा अपघात पोलीस स्टेशन वरोरा येथे नोंद

*रवींद्र शिंदे यांची पत्रकार परिषद 
*गाडीचा चालक पोलिसांच्या ताब्यात

वरोरा 25/4/23
चेतन लूतडे 
आज दि. २५/०४/२०२३ रोजी सकाळी ०६/३० वा. तक्रारदार नामे दत्ता बबन बोरकर वय ५२ वर्ष रा. वडगाव हमु, शिवनेरी नगर देशपांडे पेट्रोलपंप मागे वरोरा यांनी पोलीस स्टेशनला येवुन तोंडी रिपोर्ट दिली की, दि. २५/०४/२३ रोजी रात्री १२/१५ वा. सुमारास ते पक्षाचे कार्यालय शिवालय जाजु चौक वरोरा येथुन निवडणुक प्रचाराचे काम करून आपले मोटरसायकल फॅशन प्रो क. एम एच ३४ एसी ८६१६ ने घरी हायवे रोडणे जात असता बोलेरो सारखी पॅक गाडी माझे घराकडे जाणा-या रोडने टर्नीींगवर उभी होती. तो घराकडे जाण्यासाठी टर्नीगवर गेला असता बोलेरो सारखी गाडी चालु करून आडवी केल्याने त्याचे मोटर सायकलवरील नियंत्रण जावुन तो खाली पडला तेव्हा त्याने आवाज दिला असता गाडी चालकाने हाच साले हरामखोर निवडणुक ज्यादा आंगमे आई क्या असे म्हणुन शिवीगाळ करून तेरेको देखके चलना नही आता क्या माज गया क्या असे म्हणुन तो निघुन गेला फिर्यादी गाडीवरुन पडल्याने डाव्या पायाला घुडग्याजवळ व डाव्या खांदयाला व डोक्याला अपघातामुळे मार लागला. गाडीचा क्रमांक माहीत नाही लोकांनी डॉ. लेडे यांचे दवाखाण्यात उपचाराकरीता गेले. अशी रिपोर्ट दिल्याने पोलीस स्टेशन वरोरा येथे अप. क. ३२९/२३ कलम २७९, ३३७ भादंविचा गुन्हा नोंद करण्यात आला.
जाहिरात 
एकंदरीत आतापर्यंतचे तपासात असे निष्पन्न झाले की, रात्रो ज्या वाहनाने अपघात झाला ते वाहन विकास कोल ट्रान्सपोर्ट कंपनी एमआयडीसी वरोरा येथील ब्राउझर ( डिझेल टॅकर) क. एम एच ३४ बिजी ६५२४ असे असल्याचे निष्पन्न झाले करीता त्याचा चालक याला ताब्यात घेवुन घटनेबाबत सविस्तर विचारपुस केले असता दि. २४/०४/२३ रोजी विकास कोल ट्रान्सपोर्ट चे टॅकर क्रमांक एम एच ३४ बिजी ६५२४ नेहमीप्रमाणे डिझेल घेण्यास रात्रो ११/३० वा. देशपांडे पेट्रोलपंपमध्ये टँकर चालक व सुपरवाझर आले असता देशपांडे पेट्रोलपंप येथे डिझेल न मिळाल्याने टॅकर चालक परत वणी येथे जाण्यास चंद्रपुर नागपुर रोडवरून देशपांडे पेट्रोलपंप समोर असलेल्या डिव्हायडर कट वरून नागपुर चंद्रपुर रोडवर जात असतांना त्याचे मागुन चंद्रपुर नागपुर रोडवरून दोन वाहने आल्याने रस्त्याचे बाजुला थांबला होता ती वाहने जाताव चालकाने सदर गाडी कटमधुन नागपुर चंद्रपुर रोडवर वळवीली तेव्हा दत्ता बोरीकर हा त्याच्या मोटरसायकल फॅशन क. एम एच ३४ एसी ८६१६ वरून त्याचे घराकडे जातांना टॅकरच्या चालक साईडच्या डोअरला धडकल्याने अपघात होवुन अपघातात जखमी झाला. त्यानंतर टँकर चालकाने व सोबत असलेल्या सुपरवाझरने जखमी दत्ता बोरीकर याला त्याचे सांगणेवरून स्वता:चे वाहनात बसवुन उपचार कामी डॉ विशाल लेडे यांचे दवाखाण्यात नेले. सदर टॅकरचे चालक साईडचे डोअरला मार लागलेला आहे. टँकर चालक याने त्याचे वाहन त्याचे मागेहून कोणी येत आहे का ? याची सहानीशा न करता हयगईने व निष्काळजीपणाने वाहन वळवील्याने अपघात झाल्याचे निष्पन्न झाले असुन सदरची घटना ही अपघाताची असुन कोणतीही घातपाताची नाही. तसेच सदर टॅकर व आरोपी चालकास ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील तपास सुरू आहे.

रवींद्र शिंदे यांनी आज यासंदर्भात शिवनेरी येथे पत्रकार परिषद घेतली असून दत्ता बोरेकर यांचा अपघात जरी वाटत असला तरी हा घातपाताची  असल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे असे मत व्यक्त केले. यावेळी पत्रकार परिषदेमध्ये खेमराज कुरेकर, विजय देवतळे, रमेश राजूरकर व कार्यकर्ते उपस्थित होते.

जाहिरात 


Comments