वरोऱ्यात काँग्रेसगट बाजी मारेल?विरोधक एकवटले

वरोऱ्यात काँग्रेसगट बाजी मारेल?
विरोधक एकवटले

वरोरा 
चेतन लूतडे 
: वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीत १८ जणांनी माघार घेतल्याने ४७ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. ८१ उमेदवारांनी नामांकन भरला होता. ६३ नामांकन वैध ठरले. यामध्ये सात महिलांचा समावेश आहे. ग्रामपंचायत ६१९, सेवा सहकार गटात ७७२, अडते व्यापारी ९२, हमाल व्यापारी गटात ५६ असे १,५४४ मतदार आहेत. येथील बाजार समितीवरील बहुतांश माजी संचालक, सभापती राजू चिकटे, उपसभापती मोरे काँग्रेस  समर्थक असल्याने  भाजपच्या तुलनेत जोर अधिक दिसून येत आहे. येत्या 28 तारखेला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ संचालकांसाठी १,५४४ मतदार मतदानाचा हक्क बजावतील.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत रमेश राजूरकर, विजय देवतळे, जयंत टेंमूर्डे, रवी शिंदे,  भाजपचे बाबा भागडे, बाळू भोयर
यांचा विरोधी गट तयार झाला असून येणाऱ्या निवडणुकीत काँग्रेसला शह देण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

मुकेश जिवतोडे यांच्या गटातील दहा उमेदवार व नितीन मत्ते स्वतंत्र उमेदवार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक रिंगणात महत्वाची भूमिका बजावणार असल्याचे चित्र दिसत आहे.


मागील पंचवार्षिक योजनेमध्ये शेतकऱ्यांसाठी राबविण्यात आलेल्या योजना*

शेतकऱ्यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणात तात्काळ मदत.

मराठा चारिटेबल ट्रस्ट तर्फे शेतकऱ्यांसाठी ट्रॅव्हलर गाडीची सोय.

शेतकऱ्यांसाठी उशीर झाल्यास राहण्याची व जेवणाची सोय.

नवीन गोडाऊन शेड, शेतकरी निवास ,वॉल कंपाऊंड बांधकाम.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शॉपिंग कॉम्प्लेक्स ची निर्मिती.

मागील पंचवार्षिक योजनेत या सगळ्या बाबी शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण ठरल्या.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकी मध्ये सहकारी संस्थाचे स्वतंत्र उमेदवार नितीन मत्ते 
येत्या 28 तारखेला भरघोस मताने विजयी करा.
घोषणापत्र
उत्पन्न बाजार समिती मध्ये निवडून आल्यास शेतकऱ्यांच्या गरीब मुलांसाठी वस्तीगृह निर्माण करणे.
शेतकऱ्यांचे एक मत नितीनभाऊ मत्ते साठी

Comments