स्वातंत्रवीर सावरकर गौरव यात्रा" एक हुंकार*

*स्वातंत्रवीर सावरकर गौरव यात्रा" एक हुंकार* 

वरोरा:-  वि दा सावरकर यांची गौरवयात्रा वरोरा शहराच्या मध्य भागातून काढण्यात आली. यावेळी वरोरा शहरातील भाजपा कार्यकर्ते व संघाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. गौरव यात्रेदरम्यान  पारंपारिक वेशभूषा परिधान करून, वेगवेगळे भजन मंडळ आणि लेझीम पथकाच्या माध्यमातून ढोल ताशाच्या गजरात वीर सावरकर यांची प्रतिमा उभारून शहराच्या मध्यभागातून शोभायात्रा काढण्यात आली होती.

 सौ सुवर्णरेखाताई पाटिल व शिवसेनेच्या महिला जिल्हाध्यक्ष सौ.लांडगे, यांच्या हस्ते भारत माता पूजन व सावरकर यांचा फोटो ला माल्यार्पण करण्यात आले, शहींदाना आदरांजली अर्पण करुण गौरव यात्रेला शहीद डाहूले चौकातून शुरुआत करण्यात आली.

 *मी सावरकर* असलेला चित्ररथ तसेच *भारत माता*  सर्वांचे लक्ष्य वेधुन घेत होते, मी सावरकर, आम्ही सावरकर, च्या  घोषणा देत शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली.

यांत्रे चा समारोप गांधी चौक इथे जाहिर सभेने झाला, यावेळी मंचावर  राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष माननीय श्री हंसराज जी अहीर, मा.सुवर्णरेखाताई पाटील, विश्व हिंदू परिषद चे पांडे महाराज, सावरकर अभ्यासक विवेकजी सरपटवार,ए.अली, तालुका संघचालक सुनीलजी सरोदे, नगरसंचालक मनोज रेलकर  भाजपा युवा मोर्चा  करण देवतळे, नरेंद्र जीवतोड़े आधी भाजप व संघाचे कार्यकर्ते प्रमुख्याने उपस्थित होते.
सावरकर अभ्यासक विवेकजी सरपटवार तसेच मा.हंसराजजी अहीर यांनी  सावरकर गौरवयात्रा प्रसंगी उपस्थित जनसमुदायास संबोधित करतांना स्वातंत्र्यवीर सावरकरांवर टीका करणाऱ्या प्रवृत्तींचा कठोर शब्दात निषेध व्यक्त केला. राहुल गांधी यांनी तेजोमय सुर्यावर थुंकण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी आपलेच तोंड भाजून घेतले. स्वातंत्र्यवीरांना अवघ्या 28 व्या वर्षी काळ्यापाण्याच्या शिक्षेला देशाच्या स्वातंत्र्यासाठी सामोरे जावे लागले. 14 वर्षांचा अंगावर काटे उभे राहणारा तुरुंगवास भोगावा लागला. त्यांच्या प्रेरणेतून अनेक सशस्त्र क्रांतिवीरांचा उदय झाला. देशाच्या राजकारणात शेकडो राजकारणांचे स्वा. सावरकर प्रेरणास्त्रोत असतांना अशा महान विभूतींचा उपमर्द करण्याची दुर्बुध्दी का सुचते ? असा प्रश्न देशवासीयांना पडला आहे. सावरकरांवरील अपमानजनक टीकेची किंमत संबंधितांना चुकवावी लागेल असेही यावेळी माजी मंत्री हंसराज अहीर म्हणाले. 

 कार्यक्रमाचे संचालन श्री राजू दोडके यानी केले, या गौरव यात्रेत भारतीय जनता पक्ष, राष्ट्र सेविका समिति, विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाचे बहुसंख्य कार्यकर्त सहभागी झाले होते.
किशोर भाऊ टोंगे सामाजिक कार्यकर्ते


Comments