चंद्रपूर जिल्हा व्हॉइस ऑफ मीडिया तथा वरोडा तालुका कार्यकारणीच्या संयुक्त विद्यमाने २ एप्रिल रोज रविवारला कौटुंबिक स्नेह मिलन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. महारोगी सेवा समितीचे संस्थापक थोर समाजसेवक श्रद्धेय बाबा आमटे यांच्या आनंदवनातील कर्मभूमीत हा पहिला कौटुंबिक सोहळा होत आहे.
कोणत्याही पत्रकार संघटनेतर्फे प्रथमच अशा प्रकारचा हा सोहळा होत आहे. जगविख्यात थोर समाजसेवक स्वर्गीय बाबा आमटे यांच्या आनंदवन या कर्मभूमीतील स्वरानंदवन सभागृहात होत असलेल्या सदर सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी व्हॉइस ऑफ मीडियाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष तथा मार्गदर्शक संदीप काळे राहणार आहे. तसेच प्रमुख अतिथी म्हणून महारोगी सेवा समिती आनंदवनचे सचिव डॉ विकास आमटे यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाला असणार आहे. तर प्रमुख पाहुणे म्हणून व्हाईस ऑफ मीडियाचे प्रदेशाध्यक्ष (ग्रामीण) अनिल मस्के, विदर्भ विभाग अध्यक्ष मंगेश खाटीक, मुंबई येथील कार्यालयीन सचिव दिव्या भोसले, सामाजिक उपक्रम समितीचे राज्यप्रमुख आनंद आंबेकर,महारोगी सेवा समितीचे विश्वस्त सुधाकर कडू,सदाशिव ताजणे, व्हाईस ऑफ मीडियाचे जिल्हा अध्यक्ष संजय पडोळे व्यासपीठावर उपस्थित राहणार आहे.
या सोहळ्या दरम्यान चंद्रपूर जिल्ह्यातील संघटनेत असलेल्या सर्व सदस्यांचा दहा लाख रुपयांचा अपघात विमा काढला जाणार आहे. सदर कार्यक्रमात स्वरानंदवन या ऑर्केस्ट्रा चा लाभ उपस्थिततांना घेता येणार आहे. तसेच सोहळ्यात सहभागी होणाऱ्या महिला आणि लहान मुलांकरिता विविध खेळांचे आयोजन करण्यात आले आहे . सोबतच प्रत्येक कुटुंबाला भेट वस्तू देऊन सन्मानित केले जाणार आहे. या कार्यक्रमाला व्हाईस ऑफ मीडियाच्या जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी आणि सदस्यांनी कुटुंबासह उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा अध्यक्ष संजय पडोळे, उपाध्यक्ष श्याम ठेंगडी, कार्याध्यक्ष गुरुदास गुरनूले, यशवंत घुमे, सारंग पांडे,जितेंद्र चोरडिया, अनिल पाटील, वरोडा तालुका अध्यक्ष चैतन्य लुतडे, सचिव रवी खाडे, प्रसिद्धी प्रमुख सारथी ठाकूर यांनी केले आहे.
Comments
Post a Comment