मराठी मुस्लिम सोशल वेलेअर वरोरा* तर्फे *छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी*

मराठी मुस्लिम सोशल वेलेअर वरोरा* तर्फे *छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी*


वरोरा 
शाहिद अख्तर, वरोरा 
येथील मौलाना आझाद मुस्लिम वाचनालय येथे,
मराठी मुस्लिम सोशल वेलफेअर या संघटने तर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. या मध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. शाबान शेख साहेब
प्रमुख पाहुणे श्री. नबी कुरेशी साहेब, श्री. मुश्ताक अली साहेब, श्री. इकबाल शेख साहेब उपस्थित होते. छत्रपतींच्या प्रतिमेला हार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रास्ताविक भाषण राहील शेख यांनी केले तर प्रमुख वक्ते राहील पटेल यांनी मोलाचे मा्गदर्शन केले, अश्पाक शेख यांनी महाराजांच्या जीवनावर प्रकाश टाकला. मोहम्मद शेख यांनी आपले मत व्यक्त केले. शिवाजी महाराजांवर प्रेम करणाऱ्या मुस्लिमांनी दरवर्षी महाराजांची जयंती साजरी करून एकतेचा संदेश द्यावा असे आवाहन कार्यक्रमाचे अध्यक्ष शाबाण शेख यांनी केले.
            समाजामधे महाराजांना मुस्लिम विरोधी दाखविण्याचे षडयंत्र होत आहे. परंतु महाराज हे कोणत्याही धर्माच्या वरोधी नाही. असे दाखले देऊन मोहसिन सैय्यद यांनी आपल्या भाषणात सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुज्जमिल शेख यांनी केले तर आभार संदेश तामगडगे यांनी केले.
कार्यक्रमाचे यशस्वितेसाठी अयुब खान यांच्या नेतृत्वाखाली बशीर शेख, अतिक सैय्यद, आकाश गायकवाड, तन्वीर शेख, नेहाल, तौफिक शेख, इरफान शेख, आतिश राम, दाऊद खान, शाकीर शेख, नदीम शेख, पाशा भाई, अब्रार शेख, इत्यादिनी योगदान दिले.

जाहिरात..
हॉटेल रॉयल प्लाझा मध्ये स्पेशल ऑफर.
टेस्टी फूड साठी एकदा अवश्य भेट द्या


Comments