*शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख तथा सामाजिक कार्यकर्ते रविंद्र शिंदे यांचे मार्गदर्शन*
भद्रावती : तालुक्यातील डोंगरगाव सेवा सहकारी संस्था मर्या. र. नं. ५९७ च्या तेरा उमेदवारांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली. सदर निवडणूक प्रक्रिया बिनविरोधी व्हावी, यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख तथा सामाजिक कार्यकर्ते रविंद्र शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले.
तेरा उमेदवांरानीच केवळ फार्म भरले, विरोधी फॉर्म भरले नसल्याने सर्वच्या सर्व तेरा उमेदवार बिन विरोध निवडून आलेत. यामध्ये सर्वसाधारण गटात जयवंत ईश्वर आवारी, हनुमान तानबा टाले, दिवाकर निळकंठ खंगार, बंडू विठोबा काकडे, गोविंदा सखाराम गौरकर, राहुल सुभाष बुरण , प्रफुल दशरथ थेरे, राजू रमेश डोंगरे, बबन नामदेव धुळे, सुरेश दुधाराम आस्कर , परशुराम बापूराव कसारे, महिला राखीव गटात अर्चना हनुमान डाहुले , लीला गजानन कुथे यांचा समावेश आहे.
Comments
Post a Comment