एकोणा खाण परिसरात चहा पिताना वाद; लाठीहल्ल्यात ट्रकचालक जखमी

एकोणा खाण परिसरात चहा पिताना वाद; लाठीहल्ल्यात ट्रकचालक जखमी. कोळसा वाहनाचा नंबर लावण्यावरून वाद. खान प्रशासनाचे दुर्लक्ष वरोरा, ता. ११ एप्रिल : वरोरा येथील एकोणा माईन्स गेट क्रमांक दोन येथे काल सकाळी अकरा वाजता चहा पिताना झालेल्या वादातून तिघांनी ट्रकचालक सूर्यप्रतापसिंग कृष्णगोपाल सिंग (वय २५, रा. बिलघाडी, ता. गूनोर, जि. पन्ना, मध्यप्रदेश) यांच्यासह चार जणांवर लाठीने हल्ला केला. या हल्ल्यात सूर्यप्रतापसिंग यांच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली असून, हाताला सूज आली आहे. पोलिसांनी मनोजकुमार चंद्रवंशी, सन्नीकुमार चंद्रवंशी व सहँदरकुमार बंशी या तिघांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम  ११८(१),(२), ३५१,३५२ व जीवे मारण्याच्या धमकीच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी सूर्यप्रतापसिंग यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, आदल्या दिवशी सकाळी चार वाजता कोळसा वाहनाचा नंबर लावण्यावरून या आरोपींनी त्यांच्या साथीदार विवेक हरीसिंग याला मारहाण केली होती. ती बोलण्यासाठी सूर्यप्रतापसिंग हे आपल्या चार साथीदारांसह गेले असता, आरोपींनी कोणतीही चौकशी न करता हातातील लाकडी दांड्या...

शेतकऱ्यांच्या हितासाठी युवासेनेच्या माध्यमातुन तहसीलदार मॅडम वरोरा यांना निवेदन*

*शेतकऱ्यांच्या हितासाठी युवासेनेच्या माध्यमातुन तहसीलदार  मॅडम वरोरा यांना निवेदन*

वरोरा19/1/23
चेतन लूतडे 

 शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रपूर मुकेश जिवतोडे यांच्या मार्गदर्शनाखाली  युवासेना जिल्हा प्रमुख चंद्रपूर मनिष जेठानी यांच्या हस्ते वंचित शेतकऱ्यांना अनुदान देण्यात येण्या संदर्भात रोशन मकवाने मॅडम तहसीलदार वरोरा यांना निवेदन देण्यात आले.
 सदर माहिती याप्रमाणे आहे की महाराष्ट्र शासनाच्या वतीने महात्मा जोतिबा फुले कर्जमुक्ती योजना 2019 ला राबविण्यात आली.
या कर्जमुक्ती योजनेअंतर्गत नियमित कर्ज परतफेड करनाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेअंतर्गत 50  हजारांचे अनुदान देणे बंधनकारक होते.
मात्र युनियन बँक ऑफ इंडिया च्या वरोरा शाखेतील 33 शेतकरी अजूनही लाभपासून वंचित आहे.
 पात्र शेतकरी बँकेत वारंवार जाऊन मॅनेजरला विचारणा करीत आहेत मात्र त्यांना तारीख वर तारीख देण्यात येत आहे.
तरी 33 शेतकऱ्यांना तात्काळ लाभ देण्यात यावा अन्यथा शेतकरी विरोधी बँक  म्हणून बँकेला ताळे ठोकून युवासेना तर्फे आंदोलन करण्यात येईल अशे व्यक्तव युवासेना जिल्हा प्रमुख चंद्रपूर यांनी निवेद्वाना द्वारे कळविले.

Comments