*चंदनखेडा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ठरली तिन्ही स्तरावर संपूर्ण चॅम्पियन*

*चंदनखेडा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ठरली तिन्ही स्तरावर संपूर्ण चॅम्पियन*

भद्रावती पं.स. अंतर्गत वायगांव केंद्रांतील जि.प.शाळांतील विद्यार्थ्यांचे क्रीडासम्मेलन तथा सांस्कृतिक स्पर्धा दि.२३ व २४ जानेवारी या दोन दिवसात जि.प.उ.प्रा.शाळा वायगाव येथे पार पडल्या.या स्पर्धेचे प्रमुख बक्षिस वितरक म्हणून वायगांव च्या सरपंच मा.सौ.भावना कुरेकार,मा.सौ.निलिमा रवि कुरेकार,अध्यक्ष्या शाळा.व्यवस्थापन  समिती.वायगांव तर केंद्राचे केंद्र प्रमुख मा.यशवंत महाले,वायगांव  शाळेचे.मा.विलास बतकी,मु.अ.यांचे मार्गदर्शनात पार पडले.

        या दोन दिवशीय सांस्कृतिक स्पर्धा व माध्यमिक व प्राथमिक गटाच्या क्रीडा स्पर्धा आटोपल्यात त्या सर्व स्पर्धात "मैदानी" व "सांस्कृतिक चँम्पीयन" सह "जनरल चँम्पीयन" या तिन्ही स्तरावर चंदनखेडा शाळा केंद्रात अव्वल ठरली म्हणून जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा चंदनखेडा सर्व यशाची मानकरी ठरली.या यशासाठी शाळेच्या मुख्याध्यापक सौ.साधना धाईत व मार्गदर्शक शिक्षक राजेश गायकवाड,पंडीत लोंढे,सुभाष कुंभारे ,अर्चना धकाते,भावना गुंडमवार,अरविंद मेश्राम,ज्ञानेश्वर जांभुळे,कवडू बोढे तसेच विजयात वाटा असलेल्या समस्त विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन शाळा व्यवस्थापन समिती चंदनखेडा व समस्त पालकवर्गाकडून करण्यात येत आहे.

Comments