मालवीय वॉर्डातील स्वस्त धान्य दुकान दुसऱ्यास द्या* *वार्डवासियांची मागणी**मागणी राजकीय भावनेतून : राहूल देवाडे*
*वार्डवासियांची मागणी*
*मागणी राजकीय भावनेतून : राहूल देवाडे*
वरोडा : श्याम ठेंगडी
संगम महिला बचत गटाला मानवीय वॉर्डातील स्वस्त धान्य दुकानाचे लायसन्स देण्यात आले आहे. परंतु हे स्वस्त धान्य दुकान बचत गटाची कुठलीही व्यक्ती चालवत नसून वार्डमधील राहुल किशोर देवडे या व्यक्तीमार्फत चालवीत आहे. सदर व्यक्ती रेशन कार्ड धारकाला धान्य बरोबर देत नसल्याची माहिती वार्डवासियांनी एका पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकारपरिषदेत शासनाने ठरवून दिलेल्या रकमेपेक्षा सदर व्यक्ती जास्त रक्कम घेतो. मागील पाच वर्षात एकाही व्यक्तीला त्याने रेशन पावती दिलेली नाही. तसेच माहे डिसेंबर २२मध्ये वाटप करण्यात आलेल्या धान्यापैकी एकाच वेळेस दोन महिन्याचे आंगठे लावून धान्य काढल्याचे आढळून आलेले आहे. याबाबत विचारणा केली असता कुठल्याही रेशन कार्ड धारकाला त्याने बरोबर माहिती दिलेली नाही दोन महिन्याचे अंगठे घेणे गैर आहे . सदर स्वस्त धान्य दुकान हे मागील कित्येक महिन्यांपासून दिवसाच्या वेळेत सुरू न होता रात्री उघडते . त्यामुळे कार्ड धारकाला धान्य घेण्यासाठी रात्री उशिरापर्यंत रांगेत उभे राहावे लागते.या सर्व प्रकारामुळे संबधित व्यक्ती काही तरी काळभेर करत असावा अशी माहिती वार्डवासियांनी या पत्रकारपरिषदेत दिली.
या पत्रकार परिषदेला वार्डातील मंगल पिंपळशेंडे, ओम यादव, इमरान शेख, महादेव चौधरी, अमर गुप्ता, बंडू लभाने, श्रीमती किरण लेडे, सुरज देशमुख यांचेसह अनेक पुरुष व महिला उपस्थित होते उपस्थित
या संबधात वार्डवासियांनी तहसीलदारांना २० डिसेंबर 2022 ला निवेदन सादर केलेले आहे. सदर प्रकाराची 23 डिसेंबरला अन्न निरीक्षक चौधरी मॅडम यांनी चौकशी केली.
*दुकान दुसऱ्या गटाला द्या:मागणी*
संगम महिला बचत गटावर प्रतिबंध लादून नवीन गटाला वॉर्डातील स्वस्त धान्य दुकानाचे लायसन्स देण्यात यावे अशी मागणी वार्डवासियांनी यावेळी केली.
*मागणी राजकीय सूडबुद्धीतून :राहुल देवडे*
वार्डातील स्वस्त धान्याचे दुकान हे संगम महिला बचत गटातर्फे चालविले जाते. आपली आई गटाची अध्यक्ष असून आपण मदतनीस म्हणून या दुकानात काम करतो. दुकानात असलेल्या मशीनमध्ये बचत गटाचे अध्यक्ष, सचिव आणि मदतनीस म्हणून आपल्या नावाची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे मशीनला अंगठा लावताच संबंधिताचे नाव पावतीवर येत असते.
सप्टेंबर व ऑक्टोबर 22 या दोन महिन्याचे धान्य एकत्रितपणे वाटप करण्यासाठी 13 डिसेंबरला प्राप्त झाले आणि या दोन महिन्याचे या धान्याचे वाटप 18 डिसेंबर पर्यंत करण्याचा आदेश होता. केवळ पाच दिवसात या धान्याचे वाटप करताना दोनदा अंगठे घेण्यात आले असेही स्पष्टीकरण राहुल देवडे यांनी तरुण भारतशी बोलताना दिले.
आगामी नगरपालिका निवडणूक लक्षात घेऊन निवडणुकीच्या दृष्टीने संभाव्य उमेदवार पुढाकार घेऊन जनमत आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी हा सर्व प्रकार करीत आहेत.
आगामी नगरपालिका निवडणुक लढण्याचा आपला मानस असल्याने आपली छबी खराब करण्याचे हे एक षडयंत्र आहे असा आरोप त्यांनी बोलताना यावेळी केला.
दुकान दुकानाच्या परिसरात दिवसा नेटवर्कची समस्या असल्याने आणि संध्याकाळी ते येत होते. यासोबतच मजुरांची मजुरी वाचावी म्हणून आपण मानवतेच्या दृष्टिकोनातून दुकान सायंकाळी उघडून रात्री उशिरापर्यंत चालवत होतो. यातून सर्वांना धान्य मिळावे हाच आपला एकमेव उद्देश होता आणि यामुळे यावर नागरिक खुश असल्याचेही त्यांनी सांगितले
Comments
Post a Comment