विवेकानंद महाविद्यालयात ७६ रुग्णांनी घेतला मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ ज्येष्ठ नागरिक मंडळांने केले आयोजन

विवेकानंद महाविद्यालयात ७६ रुग्णांनी घेतला मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ


ज्येष्ठ नागरिक मंडळांने केले आयोजन

भद्रावती : स्थानिक विवेकानंद महाविद्यालय व योद्धा संन्यासी स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय पालक मित्र मंडळाच्या वतीने नुकतेच आरोग्यविषयक मोफत तपासणी शिबिर संपन्न झाले. मंडळाचे अध्यक्ष पुरुषोत्तम मत्ते यांच्या अध्यक्षतेत संपन्न झालेल्या या मार्गदर्शनपर शिबिरात नागपूर येथून आलेल्या डॉ. रितेश नवखरे व डॉ. प्रिया नवखरे यांनी विविध आजारांवर उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी मंचावर मंडळाचे सचीव माधव कवरासे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नामदेव उमाटे उपस्थित होते. या वेळी उपस्थितांनी डॉक्टरांना प्रश्नोत्तराच्या माध्यमातून आपल्या समस्या समजावून घेत मार्गदर्शनाचा लाभ घेतला.

मार्गदर्शन सत्रानंतर डाॅक्टर दाम्पत्याने मेंदूविषयक आजार, कंबर दुखणे, सायटिका, पाठ दुखणे, खांदे दुखणे, मान दुखणे, चक्कर, लकवा, तसेच महिलांचे गर्भाशय, मासिक पाळी, पांढरे पाणी जाणे, कंबरदुखी तसेच स्त्री विषयक अन्य आजारांच्या ७६ रुग्णांनी निःशुल्क तपासणी करून घेतली. कार्यक्रमाचे संचालन विठ्ठल मांडवकर, प्रास्ताविक अण्णा कुटेमाटे, आभारप्रदर्शन डॉ रमेश पारेलवार यांनी केले. यावेळी मंडळाचे पदाधिकारी, सदस्य, शहरातील जेष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Comments