वरोरा शहरात स्नेहमिलन 2023 सोहळा साजरा:

वरोरा शहरात स्नेहमिलन 2023 सोहळा साजरा:

वरोरा: वरोरा परिसरातील सामाजिक,शैक्षणिक,सांस्कृतिक, राजकीय व पत्रकारिता क्षेत्रात विविध पातळीवर काम करणाऱ्या सर्वांचा एकमेकांशी संवाद व्हावा, स्नेहमिलन घडून यावं या उद्देशाने किशोरदादा टोंगे मित्र परिवाराच्या वतीने वरोरा येथे स्नेहमिलन सोहळा आयोजित करण्यात आला होता.

या सोहळ्याला परिसरातील सर्व मान्यवरांनी आपली उपस्थिती दर्शवून या परिसराच्या विकासासाठी पायाभूत विकासकामांची असलेली गरज तसेच शैक्षणिक, सांस्कृतिक व औद्योगिक प्रगती करण्याच्या संदर्भाने अनेक मान्यवरांनी आपली मते मांडली.
यावेळी या परिसराचा सर्वांगीण विकास करावयाचा असेल तर स्थानिक पातळीवर खाण उद्योगाव्यतिरिक्त प्रक्रिया उद्योग, निर्मिती उद्योग आणण्याची गरज आहे. त्यासाठी वातावरण निर्माण करणे गरजेचे असून यासाठी राजकीय इच्छाशक्ती आणि राजकीय व्यवस्थेच पाठबळ गरजेचं आहे असे मत किशोर टोंगे यांनी मांडले.

या कार्यक्रमाला रमेश राजूरकर, बाबाराव भागडे, पांडुरंग टोंगे, प्रवीण ठेंगणे तसेच सर्वपक्षीय पदाधिकारी,विविध गावाचे सरपंच, पत्रकार आणि प्रतिष्ठित मान्यवर व तरुण कार्यकर्ते उपस्थित होते.


Comments