वरोरा वनपरिक्षेत्रात मोठी कारवाई; शिंदोला गावात १५ हेक्टर राखीव वनजमिनीवरील अतिक्रमण हटविले

वरोरा वनपरिक्षेत्रात मोठी कारवाई; शिंदोला गावात १५ हेक्टर राखीव वनजमिनीवरील अतिक्रमण हटविले वरोरा : वनविभागाने बुधवारी वरोरा वनपरिक्षेत्रातील रामपूर नियतक्षेत्रांतर्गत शिंदोला गावात मोठी धडक कारवाई करत तब्बल १५ हेक्टर राखीव वनजमिनीवरील अतिक्रमण हटवले. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. वनविभागाने यापूर्वी १३ अतिक्रमणधारकांना नोटीसा बजावून जमिनीसंदर्भातील कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, संबंधितांनी कोणतेही वैध पुरावे सादर न केल्याने वनविभागाने ही कारवाई केली. सर्व आरोपींवर वनगुन्हा नोंदवण्यात आला आहे. आज पहाटेपासून सुरू झालेल्या या मोहिमेदरम्यान जेसीबी आणि ट्रॅक्टरच्या साहाय्याने कक्ष क्र. ७ अ मधील बेकायदेशीर बांधकामे आणि अतिक्रमण जमीनदोस्त करण्यात आली. वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार, ही जमीन आता सार्वजनिक हितासाठी वापरली जाणार आहे. अतिक्रमण मुक्त केलेल्या या जागेवर आता गावकऱ्यांच्या मागणीनुसार 'वैरण विकास (गवती कुरण)' प्रकल्प राबविण्यात येणार आहे. यामुळे परिसरातील पशुधनासाठी चाऱ्याची उपलब्धता होण्यास मदत होणार असून स्थानिक दुग्ध...

ॲड. अमोल बावणे यांची भोई समाज महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी तर श्री नरेंद्र पढाल (नगरसेवक ) यांची कार्याध्यक्ष पदी निवड....

*ॲड. अमोल बावणे यांची भोई समाज  महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी तर श्री नरेंद्र पढाल (नगरसेवक ) यांची कार्याध्यक्ष पदी निवड....*

 
भोई समाजात अत्यंत मेहनती व समाजाला दिशा देण्याची धमक असणारं युवा नेतृत्व म्हणून अँड अमोल बावणे यांच्याकडे मोठ्या अपेक्षेने समाजातील घटकबघत असतानाचं खामगाव रोड शेगाव येथे राज्यव्यापी बैठकीचे आयोजन राष्ट्रीय भोई समाज क्रांती दलाच्या वतीने करण्यात आले होते या बैठकीला महाराष्ट्रातील सर्व सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय तथा राज्यस्तरीय नेते उपस्थित होत.या बैठकीत राष्ट्रीय भोई समाज क्रांती दलाचे सस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब बावणे यांनी अँड अमोल बावणे यांची राष्ट्रीय भोई समाज क्रांती दलाच्या प्रदेश अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

 
नागपूर विधान भवनावर सोमवार दिनांक 26 डिसेंबर 2022 रोजी भव्य मोर्चाचे आयोजना बाबत शुक्रवार दिनांक 16 डिसेंबर 2022 रोजी हॉटेल शिवालय गजानन महाराज वाटिकेजवळ खामगाव रोड शेगाव येथे राज्यव्यापी बैठकीचे आयोजन राष्ट्रीय भोई समाज क्रांती दलाच्या वतीने करण्यात आले या बैठकीला महाराष्ट्रातील सर्व सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय तथा राज्यस्तरीय नेते उपस्थित होते राष्ट्रीय भोई समाज क्रांती दलाचे सस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब बावणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत अनेक विषयांवर चर्चा होऊन ऐकून एकवीस मागण्याचे निवेदन महाराष्ट्र शासनास सादर करण्याचा निर्णय सर्व संघटनांच्या अनुमतीने घेण्यात आला या वेळी राष्ट्रीय भोई समाज क्रांती दलाच्या प्रदेश अध्यक्ष पदी  ॲड.अमोल बावणे यांची तर भद्रावती चे शिवसेना नगर सेवक नंदू पडाल यांची प्रदेश कार्याध्यक्ष पदी आणि खामगाव येथील सेवा निवृत्त अधिकारी प्रल्हाद शिरजोशे यांची प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली त्या बाबत त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच सर्व मान्यवरांचा शाल श्रीफळ व हार देऊन सन्मान करण्यात आला या सभेला मार्गदर्शन करतांना अखिल भारतीय भोई समाज सेवा संस्थेचे प्रदेशाध्यक्ष तुकाराम वानखडे यांनी मराठवाड्यातून जास्तीत जास्त संख्येने समाज बांधव नागपूरला येतील असा विश्वास व्यक्त केला तर भारतीय मछूवारा संघटनेचे अध्यक्ष अडव्होकेट शंकरराव वानखेडे महासचिव अडव्होकेट दादाराव अळने यांनी या मोर्चात जास्तीत जास्त संख्येने समाज बांधव यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले विदर्भ भोई समाज सेवा संघाचे अध्यक्ष उंकडराव सोनवणे, राजाराम मात्रे यांनी प्रथमच संपूर्ण समाज संघटना एकत्रित आल्यामुळे भव्य मोर्चा नागपूरला धडकणार असल्याचा विश्वास व्यक्त केला भोई समाज बहुउद्देशीय फाउंडेशन महाराष्ट्र राज्याचे उमेश नंदाने , क्रांती दलाचे कार्याध्यक्ष नंदू पडाल , विदर्भ मच्छिमार सहकारी संघाचे अर्जुन नेमाडे यांनी आपले मत व्यक्त करून बुलढाणा जिल्ह्यातून सर्वात जास्त मच्छिमार नागपूरला आणणार असल्याचे सांगितले क्रांती दलाचे प्रदेश अध्यक्ष अमोल बावणे म्हणाले की संघटनेने मला दिलेली जबाबदारी मी पूर्ण पणे जबाबदारी ने पार पाडणार.
अध्यक्षीय भाषणाचा समारोप करतांना भाऊसाहेब बावणे म्हणाले की महाराष्ट्रातील सर्व संघटना क्रांती दलाच्या विनंतीला मान देऊन एकत्र आल्या असून सर्व नेते मिळून हा मोर्चा यशस्वी करून समाजाला न्याय मिळवून देण्याकरिता प्रयत्न करतील असा विश्वास व्यक्त केला या वेळी सर्व सामाजीक संघटनेच्या प्रमुखांनी भाऊसाहेब बावणे यांच्या पाठीशी सर्व संघटना असून त्यांच्या नेतृत्वात नागपूर चा भव्य मोर्चा काढन्यात येणार असल्याचे जाहीर केले मोर्चाला अखिल महाराष्ट्र भोई समाज सेनेचे राजेंद्र तमखाने ,राष्ट्रीय मच्छीमार संघ हनुमंत मल्लाव ,राष्ट्रीय भोई समाज युवा मंच विजय करवंदे, धुळे जिल्हा भोई समाज महासंघ गणेश मोरे ,अखिल दाभोळखाडी भोई समाज रत्नागिरी, एकलव्य सेना, महाराष्ट्र केवट समाज महासंघ हेमंतकुमार केवट ,कहार समाज संघ कांतीलाल लकारिया ,बहूजन सेना सागर मोरे ,यांनी पाठिंबा दिला आहे सभेचे संचलन व आभार राजाराम मात्रे यांनी केले सभा यशस्वी करण्यासाठी क्रांती दल बुलढाणा जिल्हा अध्यक्ष,भास्कर नंदाने,दिनकर सातरोटे,उमेश राजगुरे युवा मंच विदर्भ अध्यक्ष  प्रमोद हजारे जिल्हाध्यक्ष वर्धा, श्री जादूगार अशोक पडगेलवार विदर्भ सचिव यांनी प्रयत्न केले.

Comments