वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक

वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक दुपारी कापूस टाकताना दुर्घटना; अर्ध्या तासात १० हजार क्विंटल माल राखेत रवीकमल कोटेक्स जिनिंग  येथील घटना  वरोरा .13/4/26: वरोरा तालुक्यापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर असलेल्या मार्डा रोडवरील रवीकमल कोटेक्स कापूस जिनिंग प्रकल्पात सोमवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. जिनिंग मधील कापूस डोजरद्वारे टाकत असताना ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. या दुर्घटनेत तब्बल ८ ते १० हजार क्विंटल कापूस जळून खाक झाला असून, सुमारे ८ ते १० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेच्या वेळी परिसरात मोठ्या प्रमाणात कामगार कार्यरत होते. गोदामात कापसाच्या गाठी व बाहेर ट्रक भरून कापसाच्या गाठी लोड करून होत्या. इथपर्यंत अग्निशामक दलाने आग पोहोचू दिली नाही.  आगीने पाहता पाहता रौद्ररूप धारण केले आणि अवघ्या अर्ध्या तासाच्या आतच परिसरातील हजारो क्विंटल कापूस राखरांगोळा झाला. या आगीत कापसासोबतच डोजर ट्रॅक्टर आणि इतर साहित्यही भस्मसात झाले. यानंतर अग्निशमन दलाच्या आठ गाड्या ...

ब्लॅंकेट तथा नाश्ता, मिठाईचे वाटप करून वाढदिवस साजरा.*माजी नगराध्यक्ष डुकरे यांनी ठेवला आदर्श*.

ब्लॅंकेट तथा नाश्ता, मिठाईचे वाटप करून वाढदिवस साजरा.
*माजी नगराध्यक्ष डुकरे यांनी ठेवला आदर्श*.
भद्रावती :- पैशाची कोणतीही अवास्तव उधळपट्टी न करता शहरातील शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते तथा माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर डुकरे यांनी आपला वाढदिवस शहरातील गरीब, गरजूंना ब्लॅंकेटचे वितरण व मतिमंद विद्यालयातील विद्यार्थ्यांना नाश्ता, मिठाईचे वितरण करून आपला वाढदिवस साजरा केला व समाजापुढे एक नवा आदर्श ठेवला.
वाढदिवस म्हटले की पार्ट्या जेवण खावं असा अवास्तव खर्च आला मात्र या परंपरेला फाटा देत माझी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर यांनी अत्यंत साधेपणाने व सामाजिक उद्दिष्ट समोर ठेवून आपला वाढदिवस साजरा करण्याचे ठरविले त्यानुसार त्यांनी आज सकाळी कुटुंबासह शहरातील सुप्रसिद्ध वरद विनायकाचे दर्शन घेतले त्यानंतर मंदिर परिसरातील गरीब व गरजू व्यक्तींना ब्लॅंकेटचे वितरण केले. त्यानंतर श्री गजानन महाराज निवासी मतिमंद विद्यालयात जाऊन तेथील मुलांना नाश्ता तथा मिठाईचे वितरण करून त्यांच्यासोबत वेळ घालविला व त्यांच्याशी संवाद साधून त्यांचे विचारपूस केली यावेळी माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर डुकरे, पत्नी सुनंदा डुकरे, मुलगा शुभम व सून पूजा आधी कुटुंबासह गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते तथा भद्रावती भूषण भैय्याजी मिरगे, भद्रावती ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर नितीन सातभाई आदींसह अनेक मान्यवर मंडळींची व मित्र परिवारांची उपस्थिती होती.

Comments