वरोरा जिह्याचा विषय हिवाळी अधिवेशनात आणणार *आमदार प्रतिभाताई धानोरकर यांचे आश्वासन



*वरोरा जोल्ह्याचा विषय हिवाळी अधिवेशनात गाजनार*

आमदार प्रतिभाताई धानोरकर यांचे आश्वासन

वरोरा जिल्हा, कोराडी नाला, रेल्वे पुल आणि वरोरा पर्यटन बाबत दिले निवेदन

           सर्वतोपरी जिल्हा बनन्यास योग्य असल्याने वरोरा जिल्हा संघर्ष समितीची स्थापना करून वरोरा जिल्हा झालाच पाहिजे अशी मागणी गेल्या काही वर्षापासून जोर पकडून आहे. वरोरा जिल्हा बनावा याकरीता तीन नगर परिषदा वरोरा तालुक्यातील शंभर टक्के ग्राम पंचायतींनी ग्रामसभेमध्ये वरोरा जिल्हा झालाच पाहिजे असा पाठींबा दर्शवून ठराव घेतले. वरोरा येथील जनतेने वरोरा जिल्हा संघर्ष समितीच्या पुढाकाराने लॉंग मार्च, धरणे आंदोलने केलेले आहे. जोपर्यंत विधानसभेमध्ये वरोरा जिल्ह्याचा प्रश्न येणार नाही तो पर्यंत शासनाच्या यादी मध्ये येणार नाही. वरोरा जिल्ह्याचा विषय येत्या हिवाळी घेण्यात यावा याकरीता वरोरा जिल्हा संघर्ष समिती तर्फे आमदार प्रतिभाताई धानोरकर यांना निवेदन देण्यात आले. हिवाळी अधिवेशनामध्ये वरोरा जिल्हा मागणीचा आवाज बुलंद करण्याचे आश्वासन आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी दिल्याने आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
       
       वरोरा तालुक्यातील वरोरा ते शेगांव, वरोरा ते टेमुर्डा, रामपूर परिसरात हजारो हेक्टर जमिन महसुल व वन विभागाच्या आहे. वरोरा ते शेगांव रोडवर २० कि.मी. पर्यंत रोडच्या दोन्ही बाजुला महसुल व वन विभागाच्या ताब्यात असलेल्या हजारो हेक्टर जमिनी उपलब्ध आहेत. व सभोवतालचे नैसर्गीक वातावरण निसर्ग पर्यटन योग्य आहे. याच परिसराला लागुन ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, रामदेगी पर्यटन, श्रध्देय बाबा आमटे यांचे आनंदवन सेवा भावी संस्था, वरोरा येथून जवळच भद्रावती येथे जैन मंदीर आहे. या ठिकाणी देश-विदेशातील पर्यटक येतात. पर्यटन हा सध्या जगातला सर्वात वेगाने वाढणारा व्यवसाय आहे. निसर्गाचे रूप हे पर्यटकांसाठी आकर्षणाचा बिंदू आहे. पर्यटनामुळे स्थानिक लोकांचा आर्थिक व सामाजिक विकास घडतो. त्याचमुळे जागृती सामाजिक संघटना, वरोरा तर्फे गेली काही वर्षा पासून नविन पर्यटनांची मागनी होत आहे. यात प्राणी उद्यान, बांबू उद्यान तसेच वृक्ष गृह, पक्षी उद्यान, पक्षी प्रजनन केंद्र यालाच पूरक असलेले या उद्यानाच्या सभोवताल फळ बाग उद्यान, फुलपाखरू उद्यान यालाच पुरक असलेले सभोवताल निरनिराळ्या फुल झाडांचे उद्यान, मसाले बाग उद्यान, सर्प उद्यान, जल क्रिड़ा केंद्र हे सर्व पर्यटन बनविण्यात यावे असे निवेदन नुकतेच आमदार प्रतिभाताई धानोरकर यांना दिले.

    वरोरा शहरातील कासमपंजा कोराडी नाल्याचा विषय प्रलंबीत आहे. संपुर्ण वरोरा शहराचे सांडपाणी, वनोजा शिवारातील पावसाचे पाणी आणि आनंदवन चौकापासून येणारे पावसाचे पाणी सुध्दा कासमपंजा कोराडी नाल्यात येतात त्यामुळे फिल्टर टॅक ते माढेळी रोडला तलावाचे स्वरूप पावसाळ्यात पहायला मिळते. पाण्याला वर्धा नदी पर्यंत जाण्याकरीता अडथळा असल्याने या ठिकाणावर पाणी अडून राहत आहे. त्यामुळे या भागातील जनतेला बरेच वर्षापासून भयंकर त्रास सहन करावा लागत आहे. वर्धा नदी पर्यंत नाला खोदायचा झाल्यास मधात उंच भाग येत असल्याने त्या जागेवर नाला खोल घ्यावा लागणार आहे. नाला खोल घेतल्यास नाला आपोआपच रूंद होईल. शेतकऱ्यांचे जनावर या नाल्या मध्ये पडून जखमी किंवा दगावू शकतात. त्यामुळे शेतकरी नाला बनविण्याकरीता अडथळा आनु शकतात. या ठीकानावरून वर्धा नदी पर्यंत मोठी ड्रेनेज पाईप लाईन टाकण्याची गरज आहे. पाईप लाईनमुळे पाणी सरळ नदी गेल्याने पाणी थांबनार नाही व जनतेला होणारा त्रास पुर्णपणे थांबेल. मोठी पाईपलाईन टाकून जनतेचा प्रश्न निकाली लावण्याकरीता नुकतेच आमदार सौ. प्रतिभाताई धानोरकर यांना निवेदन देण्यात आले आहे.
       
        रेल्वे स्टेशन मार्गे आनंदवन चौककडे जाताना शिवाजी चौकात एकच रेल्वे बोगदा आहे. रेल्वे लाईन पलीकडे हायवे रोडच्या दोन्ही बाजुने वरोरा शहर मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. वरोरा शहराची पूर्व-पश्चिम अशी दोन भागात विभागनी झालेली आहे. शिवाजी चौकात रेल्वे बोगदा एकच असल्याने जाणाऱ्या व येणाऱ्या लोकांना ट्राफीक जाम होत असल्याने बऱ्याच वर्षापासून मानसीक व शारीरीक त्रास सहन करावा लागत आहे. या बोगदयामधुन शाळा-कॉलेजचे विद्याथी, व्यावसाईक, पुर्व पश्चिम दोन्ही भागातील लोकांना जाने-येणे करावे लागते. एकच बोगदा असल्याने या ठीकाणी रोजच ट्राफीक जाम होत राहते. हा त्रास नाहीसा व्हावा म्हणून जागृती सामाजिक संघटनेने पुढाकार घेवून सन २०१७ ला शिवाजी चौकात दुसरा समांतर बोगदा बनविने किंवा बोगदा बनविने शक्य नसल्यास रेल्वे लाईनवर उड्डानपुल बनविण्यात यावा असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, तत्कालीन खासदार हंसराज अहीर, तत्कालीन आमदार बाळूभाऊ धानोरकर यांना लेखी निवेदने दिलेले होते. सन २०२१ मध्ये नगर परिषदेने ठराव घेवून यावर तोडगा काठावा याकरीता तत्कालीन नगराध्यक्ष अहेतेशाम अली, मुख्याधिकारी गजानन भोयर यांना निवेदन दिले होते. नगर परिषदेने कौन्सिलचे दिनांक ३०.०९. २०२१ च्या ठराव क्रमांक १४ नुसार सभेत चर्चा करून ठराव पारीतकेला. यावर कोणताही निर्णय झाला नसल्याने आमदार सौ. प्रतिभाताई धानोरकर यांना निवेदन देण्यात आले. खासदार बाळूभाऊ धानोरकर या पुला व्यतीरीक्त पुन्हा दोन उड्डानपुल बनविण्यात येत असल्याचे आमदार सौ. प्रतिभाताई धानोरकर यांनी सांगीतले.

          वरोरा जिल्हा संघर्ष समिती आणि जागृती सामाजिक संघटना, वरोरा तर्फे निवेदने देण्यात आले. निवेदन वरोरा जिल्हा संघर्ष समितीचे अध्यक्ष तसेच जागृती सामाजिक संघटना, वरोरा चे अध्यक्ष प्रविण धनवलकर, प्रविण सुराना, सुनिल फाळके, प्रमोद काळे, मारोती कुरेकार यांनी दिले..

 

Comments