भद्रावती येथे नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य वैद्यकीय शिबिराचे आयोजन.

भद्रावती येथे नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य वैद्यकीय शिबिराचे आयोजन.

आज भद्रावती येथे राजवंदन सभागृहात अनिल धानोरकर नगराध्यक्ष भद्रावती यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या शिबिरात फिजिशियन शल्यचिकित्सक बालरोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ, स्त्री रोग तज्ञ ,अस्थिरोग तज्ञ ,नेत्र तज्ञ ,दत्त चिकित्सक नाक कान व घसा तज्ञ उपस्थित आहे.
तसेच या शिबिरात मधुमेह, उच्च रक्तदाब, तोंडाच्या कॅन्सर ,गर्भाशयाच्या कॅन्सर ,थायरॉईड ,अंडवृद्धी हत्तीपायरोग आधी विविध आजाराची तपासणी व निदान करण्यात आली असून.या शिबिरात शस्त्रक्रियासाठी पात्र ठरलेल्या रुग्णांची मुफ्त शस्त्रक्रिया करण्यात आली.
त्याचप्रमाणे औषधी सुद्धा मोफत देण्यात येत असून,शिबिरामध्ये शालेय मुलाची आरोग्य तपासणी सुद्धा करण्यात आली.
याप्रसंगी खासदार बाळू धानोरकर आमदार प्रतिभा धानोरकर नगरसेवक नगरसेविका व पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments