शिवसेनेचे शिंदे गटाचे व उद्धव गटाचे समर्थक दसरा मेळाव्यासाठी मुंबईला रवाना.

शिवसेनेचे शिंदे गटाचे व उद्धव गटाचे समर्थक दसरा मेळाव्यासाठी मुंबईला रवाना.


वरोरा
चेतन लूतडे

चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रातील शिवसेनेचे वर्चस्व कायम राखण्यासाठी उद्धव गट आणि शिंदे गटात शक्ती प्रदर्शन दिसून येत आहे.

दसरा मेळाव्यानिमित्त मुंबई येथे दोन्हीही गटाच्या चंद्रपूर जिल्हाप्रमुखानी शक्ती प्रदर्शनी दाखवली आहे. शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख नितीन मते यांनी 10 खाजगी बसेस मध्ये शेकडो कार्यकर्त्यांना घेऊन मुंबई येथे प्रवास सुरू केला आहे. यावेळी शिंदे गटाच्या समर्थकांनी घोषणाबाजी करत वरोरा येथून प्रवेश सुरू केला.

तर दुसरीकडे उद्धव गटाचे मुकेश जीवतोडे यांनी रेल्वेने मुंबईला जाण्यासाठी रेल्वे बोगी बुक केली असून ठोल तास्याच्या गजरात मिरवणूक काढत शेकडो शिवसैनिक मुंबईला रवाना होत आहे. 

एकंदरीत मुंबई येथे होणारा शिवसेनेचा दसरा मेळावा अख्या महाराष्ट्रात चर्चेचा विषय बनणार आहे.
यानंतर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीदरम्यान भद्रावती वरोरा विधानसभा क्षेत्रात शिवसेनेतर्फे कोण प्रबळ दावेदार ठरेल हे मात्र जनताच ठरवेल.

Comments