विवेकानंद महाविद्यालयात उद्योजकता विकास कार्यशाळा संपन्न

विवेकानंद महाविद्यालयात 
 उद्योजकता विकास कार्यशाळा संपन्न


भद्रावती :  येणाऱ्या पुढील काळात सरकारी नोकऱ्या मिळण्याचे प्रमाण कमी होणार आहे. परिणामतः वाढणाऱ्या बेरोजगारीला आळा घालण्यासाठी युवकांनी स्वयं उद्योजकतेकडे वळणे ही काळाची हाक आहे. त्यामुळे युवकांनी विद्यार्थी जीवनातच कुटीर उद्योगाकडे वळून स्वतःच्या कुटुंबाचे अर्थाजन कसे वाढविता येईल यासाठी प्रयत्न केले पाहिजे. स्वतः कठोर परिश्रम करण्याची ज्यांची तयारी आहे त्यांना उद्योगातही भविष्य उज्वल आहे. त्यामुळे मेहनती व उद्योगी तरुणांनी उद्योजकतेकडे वळावे असे आवाहन रुरल चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष तथा जय गुरुदेव सेवा संस्थेचे अध्यक्ष  रमेश राजुरकर  यांनी व्यक्त केले. ते स्थानिक विवेकानंद महाविद्यालयातील
 आयक्यूएसी विभाग व पालक संघाच्या वतीने आयोजित "उद्योजकता विकास" या कार्यक्रमात मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते. यावेळी मंचावर विवेकानंद ज्ञानपीठ (काॅन्व्हेंट), वरोरा चे सचिव अमन टेमुर्डे , आयक्युएसी समन्वयक प्रा.मोहीत सावे होते.अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.नामदेव उमाटे उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना अमन टेमुर्डे यांनी सांगितले की, ,"ज्याच्याकडे दृष्टी आहे त्यांची सृष्टी उज्वल होईल. आपल्याकडे आहे त्या परिस्थितीचा अभ्यास करून परिश्रमपूर्वक स्वतःचे व्यवसाय उभे केले पाहिजे.आजच्या काळात इंग्रजी भाषेचे  आणि संगणकाचे ज्ञान अनिवार्य असल्याचेही त्यांनी सांगितले. या माध्यमातून स्वयंकौशल्य आत्मसात करून व्यक्तिमत्त्व विकसित करा कुटुंबाचे अर्थाजन वाढविण्यात हातभार लावा असे सांगितले. दोन्ही मान्यवरांनी अगदी कमी भांडवलात उभारता येणाऱ्या विवीध लघू व्यवसायांची माहिती सविस्तर दिली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.मोहीत सावे, संचालन डॉ. ज्योती राखुंडे, आभार डॉ.सुधीर आष्टुनकर यांनी मानले. यावेळी पालकवर्ग,महाविद्यालयातील वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील प्राध्यापक, कला व वाणिज्य शाखेतील विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पाहुण्यांना विद्यार्थ्यांनी उद्योग सुरू करण्यासाठी लागणारी माहिती प्रश्नोत्तराच्या माध्यमातून विचारली.

Comments