माजी नगराध्यक्ष अहेतेशाम अली यांना मिळाला"सकाळ आयडॉल्स ऑफ़ महाराष्ट्र" सन्मान पुरस्कार ..माजी नगराध्यक्ष अहेतेशाम अली यांना मिळाला"सकाळ आयडॉल्स ऑफ़ महाराष्ट्र" सन्मान पुरस्कार ..

       नागपूर येथे "सकाळ आयडॉल्स ऑफ महाराष्ट्र सन्मान पुरस्काराच्या" निमित्ताने नगराध्यक्ष ,सरपंच यांचा उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल सन्मान करण्यात आला.
      यावेळी वरोरा येथील माजी नगराध्यक्ष अहेतेशाम अली यांच्या कार्यकर्तुत्वाने शहर व गावाचा विकासात योगदान देत समाजिक व राजकीय क्षेत्रात उतूंग भरारी घेतलेल्या मान्यवरांचा "सकाळ अयडॉल्स ऑफ़ महारष्ट्र" पुरस्काराने गौरव करण्यात आला.
सदर पुरस्कार होटेल सेंटर पॉइंट,नागपुर येथे माजी मंत्री व भाजप प्रदेशअध्यक्ष-श्री.चंद्रशेखरजी बावनकूळे, माजी मंत्री-श्री.सुनील केदार,नागपुरचे जिल्हाधिकारी डॉ.विपिन इटनकर व अन्य मान्यवरांचा उपस्थितीत श्री.अहेतेशाम अली-माजी नगराध्यक्ष तथा जिल्हा सचिव भाजप यांना "सकाळ आयडल ऑफ़ महाराष्ट्र" पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले..*
मागील कित्येक वर्षापासून गोर- गरीब विधवा महिलांना मदत,रुग्नांसाठी सतत केलेली मदत,समाजसेवेचा भावनातुन नेहमी लोकांचा कामासाठी धाऊन जाण्याची प्रवृत्ति,कोरोना काळात रुग्नांसाठी गोर-गरीब लोकांसाठी केलेली सेवा,सार्वजनिक व धार्मिक कार्यक्रमात नेहमी सहभाग,अशा  अनेक समाजासाठी अमुल्य योगदान आणी त्यांचा यशोगाथा समाजापर्यंत पोहचवन्याची जबाबदारी सर्वाची आहे त्या अंतर्गत अहेतेशाम अली यांचे  मान्यवरांचा हस्ते पुरस्काराने गौरव करण्यात आला..! या प्रसंगी श्री.चंद्रशेखरजी बावनकूळे यांनी आपल्या संभाषणात म्हटले की,शासनाचा निधी वर अवलंबुन न राहता स्वता:चा कर्तव्याने वेगळे काही करून दाखवण्याची क्षमता असणारया लोक हेच खरे पुरस्काराचे मानकरी आहे असे व्यक्त केले. अहेतेशाम अली यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल वरोरा वासियांकडून शुभेच्छा चा वर्षाव होत आहे..!

Comments