राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात सहभागी व्हा: इटनकर*

*राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात सहभागी व्हा: इटनकर*

वरोरा शाखेच्या विजयादशमी महोत्सवात केले आवाहन

वरोडा : श्याम ठेंगडी 

    राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विविध सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून या प्रत्येक क्षेत्रातून राष्ट्र निर्माणाचे कार्य होत आहे .राष्ट्रनिर्माणासाठी आपणास ज्या क्षेत्रात काम करायची शक्य असेल त्या क्षेत्रात सहभाग नोंदवून राष्ट्रा निर्माणच्या या यज्ञात  आपल्या समिधा अर्पण कराव्यात व या कार्यास हातभार लावावा " असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभाग सहकार्यवाह सुभाषजी इटनकर यांनी येथे काढले केले. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरोडा शाखेच्या विजयादशमी महोत्सवात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते .
     येथील स्फूर्ती स्पोर्टिंग क्लबच्या मैदानावर ८ऑक्टोबर रोज शनिवारला झालेल्या या उत्सवाला स्थानिक जैन श्रावक संघाचे सचिव व योगगुरु डॉ.प्रकाश कोटेच्या हे प्रमुख पाहुणे होते. व्यासपीठावर तालुका संघचालक सुनीलजी सरोदे, नगरनगर संघचालक मनोज जी रेलकर हे विराजमान होते.
     समाजात एकटेपणाची, मी एकटा काय करू शकतो ही वाढीस लागलेली भावना नष्ट केली पाहिजे .संघ समाजात शिस्त ,देशप्रेम निर्माणच्या कामाव्यतिरिक्त माणूस घडवण्याचे कार्य करीत आहे .डॉक्टर बाबासाहेबांनी देशाला स्वातंत्र्य ,समता व बंधूता ही त्रिसूत्री दिली .यातूनच सामाजिक समरसता निर्माण होऊ शकते. संघ जातिभेद ,पंथभेद विरहित समाज निर्मितीसाठी कार्यरत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले 
*देशासाठी सर्वस्व देण्यास स्वयंसेवक तयार:कोटेच्चा*
         देशाप्रती आपले काय दायित्व आहे याचे शिक्षण संघात दिले जाते. कोणतीही अपेक्षा न ठेवता देशासाठी सर्वस्व देण्याचे संस्कार समाजावर संघ करीत आहे. म्हणून देशावर आलेल्या प्रत्येक  संकटाच्या काळात संघसेवक आपले योगदान देत आलाआहे. शिस्त, वक्तशीरपणा,देशप्रेम,
सामजिक दायित्व आदी  संघाची शिकवण असून जीवनात त्याचे सकारात्मक पालन केले तर  आपण यशाचे शिखर  गाठू शकतो असे उद्गार यावेळी बोलताना जैन श्रावक संघाचे सचिव व योगशिक्षक डॉ. प्रकाश कोटेच्या यांनी व्यक्त केले.
              ध्वजारोहणानंतर पाहुण्यांच्या हस्ते शस्त्र पूजन करण्यात आले .संघ प्रार्थने नंतर "परम वैभवी भारत होगा, संघ शक्ती का हो विचार ,गुंज उठे ,गुंज उठे भारत  माॅ की जय जयकार "हे सांघिक गीत झाले. यानंतर स्वयंसेवकांनी दंड .गणसमता ,आसने ,
सांघिक व्यायाम योग यासोबत घोषाचेही प्रात्यक्षिक स्वयंसेवकांनी सादर केले. मनोज जी रेलकर यांनी प्रास्ताविक ,पाहुण्यांचा परिचय व आभार प्रदर्शन केले. तेजस रडके यांनी हे "हे मातृभूमी भारत, हे कर्मभूमी भारत ," हे वैयक्तिक गीत, श्लोक कुंकुले  याने सुभाषित तर हर्षल पानघाटे याने अमृत वचन सादर केले. उत्सवाला संघ सेवकांव्यतिरिक्त संघप्रेमी पुरुष व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. विजयादशमी महोत्सवापूर्वी शिस्तबद्ध गणवेशधारी संघ स्वयंसेवकांचे घोषासह शहरातून पथसंचलन काढण्यात आले.या पथसंचलनावर मार्गावर पुष्पवृष्टी करण्यात येत होती.

Comments