दिशा स्कूलमध्ये रक्तदान शिबिर......

दिशा स्कूलमध्ये रक्तदान शिबिर......
वरोरा :
         महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधून दिशा स्कूलमध्ये अक्षर अमृत बहुउ्देशीय संस्था वरोरा द्वारा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उदघाटन दिशा स्कूलचे संचालक व दिशा पतसंस्थाचे उपाध्यक्ष खेमराज कुरेकार यांच्या हस्ते पार पडले. प्रमुख अतिथी म्हणून माजी सभापती छोटूभाऊ शेख, दिशा स्कूलचे संचालक सचिन सातपुते, समन्वयक शुभम पिसे, मुख्याध्यापिका नीता घागी, वर्षा कुरेकार यांची उपस्थिती होती. जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेज ब्लड बँक सावंगी पाचरण करण्यात आले होते. यावेळी 50 रक्तदात्यांनी नोंद केली होती. त्या पैकी 47 जणांनी रक्तदान केले. यावेळी दिशा स्कूलचे समन्वयक शुभंम पिसे यांचा शाल व श्री गणेशाची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला.शिबीर यशस्वी करण्यासाठी मांडवकर सर, देवेंद्र दडमल, प्रशांत पोईनकर, मनोज निकोडे,राहुल देवळे यांनी सहकार्य केले. यावेळी सर्व रक्तदात्याचे व रक्तदान शिबीरासाठी सहकार्य करणाऱ्यांचे रमेश चौधरी यांनी आभार मानले.

Comments