रोटरी क्लब वरोराच्या वतीने पानपोई व गरजूंसाठी सूती दुपट्टा, चप्पल वितरण केंद्राचे उद्घाटन

  रोटरी क्लब वरोराच्या वतीने पानपोई व गरजूंसाठी सूती दुपट्टा, चप्पल वितरण केंद्राचे उद्घाटन वरोरा : रोटरी क्लब वरोरा यांनी सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून पानपोई (पिण्याचे पाणी) तसेच गरजू व गरीब नागरिकांसाठी सूती दुपट्टे व चप्पल वितरण केंद्राचे उद्घाटन बुधवार, दि. २५ मार्च २०२६ रोजी मोठ्या उत्साहात पार पडले. नगर परिषद वरोरा यांच्या नगराध्यक्षा सौ. अर्चना आशिष ठाकरे यांच्या हस्ते या केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी रोटरी क्लब वरोराचे अध्यक्ष योगेश डोंगरवार, एजी अमित लाहोटी, प्रोजेक्ट हेड चेतन शर्मा, तसेच अमित नाहर, अभिजित मणियार, विशाल जाजू, अभिजित बोथले, अदनान सद्दीकोट, राम लोया, पियुष गुंडावार, विक्की आगलावे आदी मान्यवर उपस्थित होते. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, तसेच गरजूंना सूती दुपट्टे व चप्पलांचे वाटप व्हावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. उपस्थित नागरिकांनी रोटरी क्लबच्या या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी रोटरी क्लब वरोराच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले. ...

सेवानिवृत्त कर्मचारी महादेव ताजने यांचा सत्कार

सेवानिवृत्त कर्मचारी महादेव ताजने यांचा सत्कार

वरोरा 

वीज वितरण कंपनीचे कर्मचारी महादेव ताजने सेवानिवृत्त झाले त्याबद्दल त्यांचा 24 तास सेवा ग्रुप च्या वतीने सत्कार करण्यात आला
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रवीण खिरटकरहोते यावेळी वीज वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता प्रफुल लालसरे वीज वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता किशोर तुराणकर 24 तास सेवा ग्रुपचे अध्यक्ष लखन केशवानी उपाध्यक्ष किरण लेंडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते वीज वितरण कंपनीचे कर्मचारी महादेव ताजने यांनी मागील अनेक वर्ष रेल्वे स्टेशन परिसरात कार्य केले ग्राहकांच्या तक्रारी वेळोवेळी दूर केल्या त्यांचे कार्य संस्मरणीय राहील निवृत्ती नंतर त्यांना उत्तम आरोग्य व दीर्घ आयुष्य लाभो असे प्रतिपादन सहाय्यक अभियंता प्रफुल लालसरे यांनी केले कार्यक्रमाचे संचालन पद्माकर झोडापे यांनी तर उपस्थितांचे आभार राहुल देवडे यांनी मानले कार्यक्रमाला 24 तास सेवा ग्रुपचे पदाधिकारी व सदस्यांनी सहकार्य केले

Comments